Marathi News> भारत
Advertisement

थरकाप उडवणारा व्हिडीओ; सातव्या मजल्यावर भीषण आग, जीव वाचण्यासाठी वडिलांनी 2 मुलांच्यासह मारल्या उड्या पण....

दिल्लीच्या द्वारका सेक्टर 13 मध्ये एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीचे दृष्य अक्षरशः अंगावर काटा उभा करतील. 

थरकाप उडवणारा व्हिडीओ; सातव्या मजल्यावर भीषण आग, जीव वाचण्यासाठी वडिलांनी 2 मुलांच्यासह मारल्या उड्या पण....

दिल्लीच्या द्वारका सेक्टर आज (मंगळवार) सकाळी क्रमांक १३ मधील एका इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागली. आग इतकी भीषण होती की अनेकांनी घाईघाईने इमारतीवरून खाली उड्या मारल्या. त्यांना गंभीर अवस्थेत आयजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे वडील आणि दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर 35 वर्षीय यश यादव आणि त्यांची दोन मुले 18 वर्षांचा मुलगा आदित्य आणि 12 वर्षांची मुलगी असिमा यांनी नवव्या मजल्यावरून उडी मारली. तिघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. यश यादव फ्लेक्स बोर्डच्या व्यवसायात गुंतले होते.

यश यादवची पत्नी आणि मोठा मुलगा आगीतून बचावले असून ते सुखरुप आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीसाठी आयजीआय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोसायटीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे आणि वीज आणि पीएनजी कनेक्शनसारख्या सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. संरचनात्मक स्थिरतेचे मूल्यांकन करण्यासाठी डीडीए आणि एमसीडीला कळविण्यात आले आहे.

फायर ब्रिगेडची टीम सकाळी 10 वाजल्यापासून एमआरवी शाळेजवळील एका इमारतीच्या नव्या मजल्याला आग लागल्याची माहिती मिळाली. 

अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण सोसायटीला बाहेर काढण्यात आले आहे. तिथे राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, सोसायटीला वीज आणि पीएनजी गॅसचा पुरवठा देखील तात्पुरता थांबवण्यात आला आहे. तसेच, इमारतीच्या संरचनात्मक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी डीडीए आणि एमसीडीला कळविण्यात आले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बहुमजली इमारतींच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

Read More