Marathi News> भारत
Advertisement

मेट्रोमध्ये लेडीज सीटवर लावलेली 'ती' जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल, लोकांमध्ये प्रचंड संताप

मेट्रोमध्ये लावण्यात आलेल्या त्या जाहीरातीवरुन सोशल मीडियावर वाद, पडले दोन गट

मेट्रोमध्ये लेडीज सीटवर लावलेली 'ती' जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल, लोकांमध्ये प्रचंड संताप

Delhi Metro : दिल्ली मेट्रोच्या डब्यात लावण्यात आलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवरच ही जाहीरात लावण्यात आली आहे. ही एक कंडोमची जाहीरात (condom advertise) असून एक कपल बेडवर अतिशय रोमँटिक अंदाजात असल्याचं या जाहीरातीत दाखवण्यात आलं आहे.

काही लोकांनी हा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला असून हे खूपच लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी डीएमआरसीला (Delhi Metro Rail Corporation) लक्ष्य केलं आहे. तर काही लोकांनी यात काहीच चुकीच नसल्याच्या कमेंट केल्या आहेत. 

मेट्रोमधील जाहीराताचा फोटो एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटलंय मेट्रोत अशी जाहीरात पाहाणं प्रवाशांसाठी खूपच लाजीरवाणं वाटत आहे. त्यावर एका युजरने त्याला रिप्लायही दिला आहे. त्याने म्हटलंय यात लाज वाटण्यासारखं काय आहे? कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोण असतो. 

fallbacks

तर एका युजरने थेट डीएमआरसीला (DMRC) प्रश्न विचारला आहे. केवळ रेवेन्ह्यू मिळवण्यासाठी अशा प्रकारे जाहीरात करणं चुकीचं आहे. समाजप्रती सगळ्यांची एक जबाबदारी आहे आणि केवळ पैशांचा विचार न करता प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे. तर एका युजरने ही जाहीरात काढून टाकण्याची मागणी केली आहे. जाहीरातीमुळे प्रवासात महिलांना संकोच वाटत असल्याचं त्याने म्हटलंय. स्त्रियांचा आदर करणे म्हणजे काय? मेट्रोचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी ही जाहिरात आपल्या घराच्या आत किंवा बाहेर लावेल का? असा प्रश्नही अनेक जण उपस्थित करत आहेत. 

या जाहीरातीवरुन सोशल मीडिआवर दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. ही जाहीरात नाही तर लोकांचे विचार छोटे असल्याचं मत काही जणांनी व्यक्त केलं आहे. जाहीरात वाईट नाही तर बघणाऱ्यांची नजर वाईट असल्याचंही काही लोकं म्हणतायत. ही जाहिरात महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणारी असल्याचं काही युजर्स म्हणतायत.

दरम्यान, डीएमआरसीने यात कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन दिल्ली मेट्रोने ही जाहीर तात्काळ काढून टाकली आहे. 

Read More