Marathi News> भारत
Advertisement

इंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक

दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय. 

इंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय. 

जुनैद २००८ च्या बाटला हाऊस एन्काऊंटरनंतर फरार होता. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्याला १५ लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. 

दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं जुनैदला भारत-नेपाळ बॉर्डरवरून अटक केलीय. तो यूपीच्या आझमगडचा रहिवासी आहे. एनआयएची टीम आणि इतर चौकशी समित्या त्याची चौकशी करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुनैद याचा दिल्ली, अहमदाबाद, यूपी आणि जयपूरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग होता. त्याच्यावर एनआयएकडून १० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं तर दिल्ली पोलिसांकडून ५ लाखांचं... 

About the Author
Read More