Marathi News> भारत
Advertisement

Election Commission च्या ऑफिसबाहेर खासदारांचा तुफान राडा! राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; खासदारांना बसमध्ये भरलं

INDIA bloc March Against Election Commission: निवडणूक आयोगाविरुद्ध एकमत झाल्यानंतर 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी आज एकत्र मोर्चा काढला असून हा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे.

Election Commission च्या ऑफिसबाहेर खासदारांचा तुफान राडा! राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात; खासदारांना बसमध्ये भरलं

INDIA bloc March Against Election Commission: भारतीय जनता पार्टीकडून निवडणुकांमध्ये 'मतांची चोरी' सुरु असून त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पाठिंबा असल्याचा घणाघाती आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केल्यानंतर आज 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र विरोधी पक्षातील खासदार मोर्चावर ठाम असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती सात स्तरांचं बॅरिकेटींग केलेलं असतानाही विरोधी पक्षातील खासदारांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत मोर्चा काढला. या मोर्चाला पोलिसांनी आडवलं. त्यानंतर अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक खासदारांना एकत्रच खासगी बसमध्ये बसवण्यात आलं आहे. दुसरीकडे या मोर्चाचं नेतृत्व करत असणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बसच्या खिडकीमधून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना, "सत्य हे आहे की ते काही बोलू शत नाहीत. सत्य संपूर्ण देशासमोर आहे. हा राजकीय संघर्ष नाही. हा संघर्ष संविधान वाचवण्यासाठी आहे. हा संघर्ष एक व्यक्ती एक मत या धोरणासाठी आहे. आम्हाला स्वच्छ आणि संपूर्ण मतदारयादी हवी आहे," असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

आमचं शांततेत आंदोलन

"आम्ही शांततेत आंदोलन करत आहोत. आम्ही महात्मा गांधींना आमचा आदर्श मानतो," असं सुप्रिया सुळेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. पोलिसांनी राहुल गांधींबरोबरच प्रियका गांधी, संजय राऊत, सागरिका घोष यांच्यासहीत इतर खासादरांना ताब्यात घेतलं. बिहारमध्ये सुरु असलेल्या निवडणूक याद्या अपडेट करण्यासंदर्भातील एसआयआरच्या कामावरही विरोधकांचा आक्षेप आहे.

महिला खासदार बेशुद्ध पडली

या आंदोलनादरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार मिताली बाघ बेशुद्ध पडल्या. त्यावेळेस राहुल गांधींनी त्यांना मदत केली.

माफी मागा नाहीतर...

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काल बजावलेल्या नोटीसीनंतर, महाराष्ट्राच्या सीईओ आणि हरियाणाच्या सीईओंनी कालच्या रिमाइंडरनंतर निवडणूक आयोगाने आता पुन्हा राहुल गांधींनी पत्रावर उत्तर द्यावे नाहीतर देशाची माफी मागण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही.

FAQ

1. इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा का काढला?
इंडिया आघाडीने भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत "मतांची चोरी" आणि मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. विशेषतः बिहारमधील विशेष गहन संशोधन (SIR) प्रक्रियेवर आणि 2024 च्या निवडणुकीतील कथित मतचोरीवर आक्षेप घेत हा मोर्चा काढण्यात आला.

2. या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली होती का?
नाही, दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीच्या या मोर्चाला परवानगी दिली नव्हती. तरीही विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोर्चा काढला, आणि निवडणूक आयोगाच्या कार्यालयाभोवती सात स्तरांचे बॅरिकेड्स उभारण्यात आले होते.

3. मोर्चादरम्यान पोलिसांनी काय कारवाई केली?
दिल्ली पोलिसांनी मोर्चाला अडवले आणि अनेक खासदारांना ताब्यात घेतले. काही खासदारांना खासगी बसमध्ये बसवण्यात आले. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळे, सागरिका घोष यांच्यासह इतर खासदारांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

Read More