Women Fighting Video : महिला किंवा तरुणी यांच्यामधील हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर महिलांच्या मारामारीचे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. या भांडण्यामागील कारण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. असं म्हणतात मुलींना भांडण्यासाठी विषय लागत नाहीत. कुठल्या विषयावरून दोन महिला एकमेकांच्या झिंट्या उपटील सांगता येणार नाही. असाच एक सोशल मीडियावर महिलांचा भरबाजारातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये महिला एकमेकींना का तुडवत आहे, हे कळल्यानंतर हसू की डोक्याला हात मारून असं काहीस होईल.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे. तुम्हाला महिलांचे कपडे प्रेम माहिती आहे ना..., महिलांच्या या कपडे प्रेमामुळे अनेक वेळा तुम्ही पुरुषांना वैतागलेले पाहिलं असेल. अनेक मार्केटमध्ये महिला कपड्यांची खरेदी करतात आणि पुरुष त्यांच्या शॉपिंगच्या बॅग उचलताना पाहिलं आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ कपड्या मार्केटमधील आहे. जिथे सुरुवातीला दोन महिला एकमेकांना मारताना दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडीओ पुढे पाहिल्यावर दिसतं की, एक दोन तीन चार महिला एकमेकांच्या झिंट्या उपटताना दिसत आहे.
Kalesh b/w Ladiss over they both wanted to Buy Same Cloth:
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 8, 2025
pic.twitter.com/SNF6xdfbBy
मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मुंबई नाही तर दिल्लीतील कपड्यांच्या मार्केटमधील आहे. झालं असं की, एकच ड्रेस या दोघींना आवडल्याने या दोन महिलांमध्ये त्या एका ड्रेसवरून भांडण झालं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झालं. एकीन दुसरीच्या कानाखाली जोरदार मारली आणि तिला प्रत्युत्तरात तिनेही कानाखाली मारली. त्यानंतर वादाच रुपांतर हाणामारीत झालं आणि त्या दोघांनी एकमेकींना चांगलच चोपलं. दोघींनी एकमेकींची केस ओढले, ड्रेस ओढले. मध्यस्थी करणाऱ्या महिलेलाही त्यांनी या हाणामारीत ओढलं. महिलांचं हे भांडण बघण्यासाठी मार्केटमधील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका यूजर्सने लिहिलंय की, 'मॉर्डन कपडे घातले तरी हसण्यासारखं काम करतायत. कपडे चांगले पण मानसिकता मात्र बदललेली नाही, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.' दुसऱ्याने लिहिले की, 'कपड्यांच्या बाबतीत तडजोड नाही.'