Marathi News> भारत
Advertisement

अपमानाचा राग, संपत्तीची हाव...; 20 वर्षीय मुलानेच आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या केली

Delhi Triple Murder Case: दिल्लीत एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

अपमानाचा राग, संपत्तीची हाव...; 20 वर्षीय मुलानेच आई-वडील आणि बहिणीची निर्घृण हत्या केली

Delhi Triple Murder Case: दिल्ली येथे झालेल्या ट्रिपल मर्डर केसमध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने त्याच्याच आई-वडील आणि बहिणीची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिताआधारे तक्रार दाखल केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आले आहे. 

दिल्लीतील राजेश कुमार, कोमल आणि कविता यांची हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हत्येनंतर घरात कोणतीही तोडफोड किंवा सामानाची चोरी झाली नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषणात घटनास्थळावरुन कोणत्याही संशयास्पद व्यक्तीची नोंद आढळली नाही. शेजाऱ्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी म्हटलं की, मृतकांचे कोणाशीतरी वाद झाले नव्हते. 

पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारे मयताचा मुलगा अर्जूनला ताब्यात घेण्यात आले. जेव्हा त्याची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने गुन्हा कबूल गेला. आरोपी अर्जुनची चौकशी केल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात त्याने म्हटलं आहे की, त्यांचे वडील माजी सैनिक होते. ते सतत त्याला आभ्यासावरुन ओरडत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आरोपीला सर्वांसमोर मारले होते त्यामुळं त्याला अपमानित झाल्यासारखे वाटले. 

आरोपी त्याच्याच घरात वेगवेगळा राहत होता. त्याचे कुटुंबीय त्याला पाठिंबा देत नव्हते. त्याच दरम्यान त्याला कळलं की त्याचे वडिल त्याच्या बहिणीला सगळी संपत्ती देत आहेत. त्यावरुन तो नाराज झाला आणि त्याने तिला मारण्याचा निर्णय घेतला. बुधवारी  त्याने घरातील चाकू काढला आणि आई-वडिलांसह बहिणीची हत्या केली. त्याच्या आई-वडिलांची 27वी लग्नाचा वाढदिवस होता. त्याचवेळी ही घटना घडली आहे. 

पोलिस उपायुक्त दक्षिण अंकित सिंह यांनी म्हटलं आहे की, मयत दाम्पत्याचा मुलगा अर्जुन सकाळी फिरुन आल्यानंतर त्याच्या मामाला फोन करुन या घटनेची माहिती दिली. आरोपीचे मामा सतीश कुमार याने म्हटलं की, जेव्हा मी माझी बहिण, भावोजी आणि भाचीला निपचित पडलेले पाहिलं तेव्हा मी सुन्न झालो. मला सकाळी जवळपास 7.30 वाजण्याच्या सुमारास भाच्याचा फोन आला त्यानेच या घटनेबाबत सांगितलं तेव्हा मी ऐकून सुन्न झालो, असं त्याने म्हटलं आहे. 

हरियाणायेथे राहणारे हे कुटुंब मुलाच्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी जवळपास 15 वर्षांपूर्वी दिल्लीत आले होते. अर्जुन आणि कविता दोघेही मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट होते. या घटनेने नातेवाईंकासह त्यांच्या शेजाऱ्यांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. 

Read More