खालिद का शिवाजी चित्रपटावरुन वादाची शक्यता आहे. हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणी हिंदू महासंघानं केली. यासाठी हिंदू महासंघानं सेन्सॉर बोर्डाला पत्रही पाठवलं असून निर्मात्यालाही नोटीस बजावण्यात आली. चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्यात आल्याचा आरोप हिंदू महासंघानं केला.