Marathi News> भारत
Advertisement

फडणवीस यांना बिहार निवडणुकीत जबाबदारी का दिली जाऊ शकते ?

 महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षातर्फे बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे.  

फडणवीस यांना बिहार निवडणुकीत जबाबदारी का दिली जाऊ शकते ?

अमित जोशी, मुंबई : राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षातर्फे बिहार निवडणुकीत काही जबाबदारी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बिहार निवडणुक प्रभारी म्हणून पक्षातर्फे जवाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये निवडणुकीचे वारे केव्हाच व्हायला सुरुवात झाली असून यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड बरोबर निवडणूक लढवतांना सर्वाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. यासाठी देशातील प्रमुख भाजप नेत्यांना बिहारमध्ये पाचारण केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनाही पाचारण केले जाण्याची अधिक शक्यता आहे. 

जबाबदारी का दिली जाऊ शकते ?

फडणवीस हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासातील नेते आहेत. राज्य पातळीवर संघटन कौशल्य सिद्ध केले आहे. तसेच त्यांचे हिंदीवर प्रभुत्व आहे. दुसरी बाब म्हणजे ते तरुण नेत आहेत, ही त्यांची जमेची बाजू आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच केंद्रीय पातळीवर जबाबदारी देत भविष्यात मोठ्या जवाबदारीची पक्षाकडून केली जाणार चाचपणी भाजपकडून करण्यात येत आहे. 

Read More