Digital Begging Trend: सामान्य लोकांना सरकारी सेवा सहज मिळू शकतील या उद्देशाने डिजिटल इंडियाचे स्वप्न सुरू करण्यात आले होते. सर्वसामान्य लोकांना छोट्या छोट्या कामासाठी सरकारी ऑफिसमध्ये जायची गरज लागत नाही. आज ही योजना यशस्वी झालीय. भारतात आता 95 कोटींहून अधिक इंटरनेट यूजर्स आहेत. इंटरनेट स्वस्त झाल्यामुळे ही संख्या झपाट्याने वाढलीय. या डिजिटल क्रांतीचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे लाखो लोक युट्यूब आणि इंस्टाग्राम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर बनलेयत. लोक त्यांची कला आणि प्रतिभा दाखवून पैसे कमवतात. पण आता ऑनलाइन भीक मागण्याचा मार्ग हा एक नवीन आणि विचित्र ट्रेंड उदयास आलाय.
अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक माणूस युट्यूबवर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना दिसतोय. त्याचा UPI QR कोड त्याच्यासमोर ठेवण्यात आलाय. तो कोणतेही गाणे गात नव्हता किंवा कोणतेही कौशल्य दाखवत नव्हता. तो फक्त बसला होता आणि लोक त्याला ऑनलाईन पैसे पाठवत होते. ही एक वेगळी घटना नाही. आता असे अनेक व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर दिसतात. जिथे लोक काहीही न करता पैसे मागतात आणि कमाईदेखील करतात. हा व्हिडिओ प्रथम एक्स (पूर्वीच्या ट्विटर) वर शेअर करण्यात आला. असे अनेक अकाउंट दिसतील.
'मी असा एक माणूस पाहिला जो दिवसभर स्क्रीनसमोर बसून म्हणतो - मला खोलीच्या भाड्यासाठी 50 रुपये लागतात. तो UPI द्वारे दररोज 5 हजार ते 10 हजार रुपये कमवतो, अशी कमेंट एकाने केलीय. दुसऱ्याने लिहिले, "भाऊ, यूट्यूबवर अशी अनेक अकाउंट्स आहेत. एकदा मी UPSC तयारीच्या नावाखाली भीक मागणाऱ्या 50 वर्षीय काकांचा मीम पाहिला.'
Wtf
— (@Trolling_isart) June 2, 2025
Bc Online Bheekh mang rhe h log pic.twitter.com/t8SLCAlxjJ
'ही तर फक्त सुरुवात आहे. काही लोक UPSC तयारीच्या नावाखाली देणग्या मागतात. काही मेंदीने नावे लिहितात. काही फक्त स्केच पेनने शैलीत नावे लिहितात. मला समजत नाही की हे व्हिडिओ प्रत्येकाच्या स्क्रीनवर कसे येतात',अशी कमेंट तिसऱ्या एका युजरने केलीय. डिजिटल इंडियाने भीक मागण्याच्या पद्धती देखील बदलल्या हे या ट्रेण्डवरुन स्पष्ट होते. आता लोक रस्त्यावर पैसे मागत नाहीत तर स्क्रीनसमोर बसून त्यांना पैसे पाठवतायत, असे यातून दिसते.