Marathi News> भारत
Advertisement

'मला जितका इस्लाम समजलाय...,' धर्मांतर करणाऱ्या दीपिकानं पहलगाम हल्ल्याबाबत मौन सोडत हे काय म्हटलं?

Dipika Kakar on Pahalgam terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक स्तरांतून त्यावर प्रतिक्रिया आल्या. इस्लाम धर्म स्वीकारणारी दिपिकासुद्धा यात मागे राहिली नाही...   

'मला जितका इस्लाम समजलाय...,' धर्मांतर करणाऱ्या दीपिकानं पहलगाम हल्ल्याबाबत मौन सोडत हे काय म्हटलं?

Dipika Kakar on Pahalgam terror Attack : संपूर्ण देशाला हादरा देणाऱ्या आणि सुरक्षाव्यवस्थांना खडबडून जागं करणाऱ्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानं अनेक निष्पापांचा बळी घेतला. घटनास्थळावरील प्रत्येक दृश्यानं पाहणाऱ्यांचा थरकाप उडवला. हे तेच ठिकाण होतं, जिथं दिपिका हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच कुटुंबासोब जाऊन आली होती. परतीच्या वाटेवर असतानाच तिच्यापर्यंत हल्ल्याची बातमी पोहोचली आणि नेमकं कसं व्यक्त व्हावं हेच तिला कळेना. 

'ससुराल सिमर का' फेम अभिनेत्री दिपिका कक्कर सध्या तिच्या युट्यूब चॅनलसह एका रिअॅलिटी शोमुळंही चर्चेत आहे. पण, पहलगाम हल्ल्यासंदर्भात तिनं दिलेली प्रतिक्रिया सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. You Tube Vlog च्या माध्यमातून तिनं अखेर या हल्ल्यासंदर्भात मौन सोडत आपल्या बोलण्यात इस्लाम धर्माचाही उल्लेख केला आहे. 

इस्लामविषयी स्पष्टच बोलली दिपिका 

नव्या व्लॉगमध्ये दिपिका इस्लामविषयी म्हणालीय, 'मला जितका इस्लाम धर्म समजला आहे, मी पूर्ण प्रमाणिकपणे सांगू इच्छिते कोणीही सच्चा व्यक्ती हे करू शकत नाही. तो कोणत्याही धर्माच्या नावे कोणाला मारू शकत नाहीत. मग, तो इस्लाम असो किंवा आणखी कोणता धर्म. कोणताही धर्म दुसऱ्या धर्माच्या लोकांना ठार करा असं शिकवत नाही. एकमेकांसोबत खेळीमेळीनं राहा, एकमेकांचा मान राखा असंच तर आपल्याला शिकवण्यात आलं आहे. हे घृणास्पद कृत्य करणारे लोक कोणत्याच धर्माचं पालन करुच शकत नाहीत. ते फक्त दहशतवादीच आहेत....'

सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहताना...

आपण दिल्लीपर्यंत पोहोचल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान या हल्ल्याची माहिती मिळाल्याचं तिनं व्लॉगमध्ये सांगितलं. ज्या क्षणी ही बातमी मिळाली तेव्हा भयानक म्हणावं की वेदनादायी हेच तिला कळेना, इतका मोठा धक्का तिच्यासह इतरांनाही बसला होता. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहताना, ज्यांनी आपल्या माणसांना गमावलं आहे त्यांच्या वेदना आपल्याला कळूच शकणार नाहीत, असं म्हणत दीपिकानं या हल्ल्याची निंदा केली. 

दिपिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून, तिच्या खासगी जीवनाविषयी चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. 2018 मध्ये तिनं अभिनेता शोएब इब्राहिमसोबत लग्न करत वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली होती. लग्नापूर्वी दिपिकानं इस्लाम धर्म स्वीकारत फायजा अशी आपली नवी ओळख तयार केल्याचं म्हटलं जातं. 

Read More