Marathi News> भारत
Advertisement

Explained : ट्रम्प यांच्या निर्णयानंतर 25% Tariff मुळं भारताच्या 'या' वस्तूंवर थेट परिणाम

Tariff War : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही काळापासून विविध देशांना आयात शुल्काच्या कात्रीत पकडलं आणि त्यात आला भारताचाही समावेश झाला आहे.   

Explained : ट्रम्प यांच्या निर्णयानंतर 25% Tariff मुळं भारताच्या 'या' वस्तूंवर थेट परिणाम

Tarrif War : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी (America President Donald Trump) येताच डोनाल्ड ट्रम्प अनेक असे निर्णय घेणार ज्याचे थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येतील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता आणि तसंच झालं. आयात शुल्काच्या मुद्द्यावरून जगातील अनेक देशांना अमेरिकेनं घाम फोडलेला असतानाच भारतालाही दणका दिला आहे. भारतावर अमेरिकेनं 25 टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा करत रशियाकडून तेल आणि लष्करी सामग्रीच्या खरेदीवरही पेनल्टडी लागू केली आहे. 1 ऑगस्टच्या 'डेडलाईन'पूर्वीच ट्रम्प यांनी ही घोषणा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

2021 पासून भारताशी व्यापार, तरीही आयात शुल्काचा मारा? (Tariff)

भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश 2021 पासून 'ट्रेडिंग पार्टनर' असून 2024-25 दरम्यान या दोन्ही देशांचा व्यापार साधारण 186 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. यामध्ये भारताचा आयात वाटा 86.5 अब्ज डॉलर आणि अमेरिकेचा वाटा होता 45.3 अब्ज डॉलर. भारतानं व्हिस्की, मोटरसायकर अशा वस्तूंवरील आयात शुल्कात कपात केली असली तरीही अमेरिकेनं मात्र याविरोधातच भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. 

अमेरिकेच्या 25% आयात शुल्कानंतर भारतातील कोणती उत्पादनं महागली? 

स्मार्टफोन- भारतातून अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात निर्यात केली जाणारी वस्तू आहे स्मार्टफोन. Apple च्या मॉडेलचीसुद्धा आता भारतातच निर्मिती होत असल्या कारणानं भारतानं आयफोन निर्यातीत चीनलाही मागे टकलं आहे. 2025 मध्ये भारतानं अमेरिकेत 24.1 बिलियन डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 55 टक्के अधिक असला तरीही आता त्यावरच आयात शुल्काच्या निर्णयाचा जबर फटका बसणार आहे. 

औषधं - भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची उत्पादनं आहेत फार्मास्यूटिकल अर्थात औषधं. सर्वसामान्य औषधांसमवेत भारतातून इतरही काही संबंधित औषधांची निर्यात केली जाते. 2025 मध्ये हा निर्यातीचा आकडा 10 बिलियन डॉलर इतका असून, भारतातील एकूण औषध उत्पादनांपैकी निर्यातीचा हा आकडा 31-35 टक्के इतका आहे. त्यामुळं करसवलत नाही मिळाली तर आयात शुल्कामुळं अमेरिकेत भारतीय उत्पादनांची किंमत वाढू शकते. 

कापड- तिसऱ्या क्रमांकावरील निर्यात उत्पादन आहे कापड. भारतानं 2025 मध्ये अमेरिकेत जवळपास 10.8 बिलियन डॉलरचे 'अपेरल क्लॉथ' निर्यात केले असून, या बाबतीत अमेरिका मोठ्या प्रमाणात भारतावर अवलंबून आहे. सध्या अमेरिकेकडून भारतीय कापड उत्पादनांवर 10 ते 12 टक्के आयात शुल्क आकारला जातो. मात्र हा आकडा वाढून 25 टक्क्यांचा नियम लागू केल्यास भारतीय कापड उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे. 

हेसुद्धा वाचा : पृथ्वीचा चंद्र नाहीसा होणार? प्रचंड वेगाने लघुग्रह धडकणार? जनजीवनावर काय परिणाम होणार?

 

हिरे आणि दागिने- सध्याच्या आर्थिक वर्षात भारतानं साधारण 12 मिलियन डॉलरचे हिरे आणि दागिन्यांची निर्यात केली. या वस्तूंवर आधीच 27 टक्के आयात शुल्क लागू आहे. त्यात आता वाढीव 25 टक्क्यांची भर पडल्यास नफ्याचा आकडा गाठणं कठीण होणार आहे. 

ऑटो पार्ट- गतवर्षात भारतानं साधारण 2.2 बिलियन डॉलर इतक्या किमचीचे वाहनांसाठीचे विविध भाग अर्थात ऑटो पार्ट आणि तत्सम गोष्टींची निर्यात केली. मात्र ट्रम्प यांच्या 25 टक्के आयात शुल्काच्या निर्णयामुळं भारतातील इंजिनिअरिंग गुड्स क्षेत्रावरही परिणाम पडताना दिसू शकतो. 

Read More