Marathi News> भारत
Advertisement

भारत- अमेरिका टॅरिफ वॉर सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारतात राहायला येणार?

Donald Trump Residential Certificate: भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच एक अत्यंत विचित्र बातमी समोर आली आहे.

भारत- अमेरिका टॅरिफ वॉर सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारतात राहायला येणार?

Donald Trump Residential Certificate: भारतावर एकूण 50 टक्के टॅरिफ आकरण्याचा निर्णय जाहीर केल्याने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात भारतामधून संताप व्यक्त केला जात आहे. ट्रम्प यांनी कोणताही विचार न करता हा निर्णय घेतला असल्याची टीका केली जात आहे. असं असतानाच आता ट्रम्प हे अमेरिकेतून थेट बिहारमध्ये राहायला येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिहरमध्ये डोमेलाइल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्रासाठी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावून अर्ज करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. 

आधी मुख्यमंत्री अन् आता थेट अमिरेकी राष्ट्राध्यक्ष

बिहारमध्ये निवडणुकांपूर्वी मतदार याद्या अपडेट करुन घेतल्या जात असल्याने रहिवासाचा पुरावा म्हणून रहिवासी प्रमाणपत्राची मागणी वाढली आहे. मात्र याच वाढत्या मागणीदरम्यान बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच येथे 'डॉग बाबू' नावाने रहिवासी प्रमाणपत्र तयार केल्याचं समोर आलं. एका प्रकरणामध्ये तर थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे फोटो लावून रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केल्याचं समोर आला. आता याच बनावट अर्जांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो लावून रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. वारंवार असे प्रकार होत असल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. हा प्रकार बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात घडला आहे. 

अर्जात भरलेली माहिती काय?

ट्रम्प यांच्या नावाने करण्यात आलेल्या अर्जात अर्जदाराचे नाव 'डोनाल्ड जॉन ट्रम्प' असं असून वडिलांचे नाव 'फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प' आणि आईचे नाव 'मेरी अँनी मॅकलिओड' असे लिहिण्यात आले आहे. चौकशीत हा अर्ज बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याने तो तात्काळ रद्द करण्यात आला. पोलिसांनी सायबर गुन्ह्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कुठून करण्यात आलेला हा अर्ज?

समस्तीपूर जिल्ह्यातील मोहद्दीनगर ब्लॉकमधील लोकसेवा केंद्रात एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. 2 अर्जासोबत एक फोटो जोडलेला होता, तो फोटो पाहून यात फेरफार करण्यात आल्याचे दिसत होते. तर अर्जात पत्ता गाव मोहद्दीनगर, वॉर्ड क्रमांक 13, पोस्ट बाकरपूर, जिल्हा समस्तीपूर असे लिहिण्यात आले होते.

प्रशासनाने काय स्पष्टीकरण दिलं?

या घटनेची माहिती मिळाल्यावर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) आणि सर्कल ऑफिसर (सीओ) यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, प्राथमिक तपासणीत हा अर्ज पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे हा अर्ज रद्द करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या बनावट प्रमाणपत्र प्रकरणी तपास सुरू आहे.

Read More