Marathi News> भारत
Advertisement

डोनाल्ड ट्रम्प हे काही भगवान राम नव्हेत, काँग्रेसची टीका

मेलानिया ट्रम्प यांच्या शाळेतल्या भेटीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण देण्यात आलेलं नाही

डोनाल्ड ट्रम्प हे काही भगवान राम नव्हेत, काँग्रेसची टीका

नवी दिल्ली : ट्रम्प हे काही भगवान राम नव्हेत ज्यांच्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय, अशी टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही केलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भोजन समारंभासाठी काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण देण्यात आलंय. २५ फेब्रुवारीला हा समारंभ होणार आहे. यात लोकसबेतील काँग्रेसचे नेते  अधीर रंजन चौधली आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित करण्यात आलंय. 

ट्रम्प यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कोणत्याच कार्यक्रमात आमंत्रित न केल्याबद्दल काँग्रेसनं टीका केली होती. तसेच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी अहमदाबादमधल्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चावरूनही सरकारवर टीका केली होती. 

दरम्यान दिल्लीतल्या मेलानिया ट्रम्प यांच्या शाळेतल्या भेटीदरम्यान दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण देण्यात आलेलं नाही त्यावरूनही सरकारवर टीका करण्यात येत आहे. 

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. रोड शोच्या मार्गावरचे रस्ते सजवण्यात आले आहेत. स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. अनेक ठिकाणी छोटे स्टेज उभारण्यात आले आहेत. ते आज साबरमती आश्रमाला देखील भेट देणार आहेत. त्यांचं जंगी स्वागत करण्यासाठी साबरमती आश्रम सज्ज झाला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागतासाठी भारत आतुर असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Read More