Jaya Bachchan in Rajya Sabha: बुधवारी राज्यसभेत 'ऑपरेशन सिंदूरवर' चर्चा सुरु होती. या चर्चेत बोलताना खासदार जया बच्चन यांनी सरकारवर टीका केली आणि पहलगाम हल्ल्यात लोकांचा विश्वास तुटला आहे असे सांगितले. त्या म्हणाल्या की, या हल्ल्यात ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांचे कुटुंब तुम्हाला माफ करणार नाही.
एवढंच नव्हे तर 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावावर प्रश्न उपस्थित करताना त्या म्हणाल्या की, लोकांचे कुंकू उद्ध्वस्त झाले होते. अनेक महिलांनी आपले पती गमावले आणि या ऑपरेशनला हे नाव देण्यात आले होते. यादरम्यान सत्ताधारी खासदार जया बच्चन यांच्यावर टीका करत होते. यावेळी जवळ बसलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना जया बच्चन फटकारताना दिसल्या. त्यांनी प्रियांका यांना भाषणादरम्यान 'माझ्यावर नियंत्रण ठेवू नका' असे सांगितले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरून बराच गोंधळ पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष सदस्य या दहशतवादी हल्ल्याशी आणि त्यानंतर झालेल्या लष्करी कारवाईशी संबंधित प्रश्न सतत उपस्थित करत आहेत.
मंगळवारी, पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांनीही लोकसभेत या विषयावर प्रतिक्रिया दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विरोधी पक्षाच्या खासदारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये प्रश्नोत्तरांचा हा सिलसिला अजूनही सुरू आहे. दरम्यान, बुधवारी राज्यसभेत आपल्या भाषणादरम्यान जया बच्चन यांनी इतर सदस्यांनी केलेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त केली.
ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान जया बच्चन बोलत असताना इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात, जया बच्चन यांनी ऑपरेशन सिंदूरच्या नावावर प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाल्या, तुम्ही असे लेखक ठेवले आहेत जे मोठी नावे देतात! पण या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का ठेवले गेले? अनेक पत्नींनी आपले पती गमावले असून त्यांचे कुकूं नष्ट झाल्याच त्या म्हणाल्या.
यावर काही सदस्य बोलू लागले. यानंतर जया बच्चन म्हणाल्या की, एकतर तुम्ही बोला, नाहीतर मी बोलेन. दुसऱ्या बाजूच्या सदस्यांनी आवाज उठवला तेव्हा जया बच्चन पुढे म्हणाल्या की, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला अडवत नव्हते. आता मी बोलत आहे, म्हणून माझ्या वेळेत मला अडवू नका.
राज्यसभा सांसद जया बच्चन #MP #JayaBachchan #modi pic.twitter.com/lC4Eh2uPM3
— Ashok Shera (@ashokshera94) July 30, 2025
इतर सदस्यांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर, जया बच्चन यांनी जवळ बसलेल्या शिवसेना (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनाही फटकारले. त्यांनी प्रियांका यांना सांगितले - मला नियंत्रण ठेवू नका. जया बच्चन यांनी प्रियांकाला हे सांगताच ती देखील अस्वस्थ झाली. त्यानंतर ती हसत हसत चेहरा लपवू लागली.