Marathi News> भारत
Advertisement

आंतरजातीय विवाह केल्याने मुलाची हत्या, बदला म्हणून मुलीच्या आईचा खून

आंतरजातीय विवाहातून दुहेरी हत्याकांड, थरारक घटनेने देश हादरला  

आंतरजातीय विवाह केल्याने मुलाची हत्या, बदला म्हणून मुलीच्या आईचा खून

Jamnagar Double Murder: आंतरराजातीय विवाह केल्याने तरुण आणि त्याच्या सासूच्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
 
सोमा भाई गढवी या तरुणाने मुलीच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध रुपलेखा नावाच्या तरुणीशी लग्न केलं. या लग्नाला दोनाही कुटुंबियांचा प्रचंड विरोध होता. सोमा आणि रुपलेखा दोघंही जामनगरच्या हापा योगेश्वर या एकाच परिसरता राहणारे होते. दोघांच्या लग्नाला एक वर्ष उलटून गेल्यानंतरही राग शांत झाला नव्हता.

मुलीच्या कुटुंबियांकडून या लग्नाला टोकाचा विरोध होता.  ते सोमाला मारण्यासाठी संधीच्या शोधात होते. अशातच शनिवारी सोमा राजकोट रोडवरच्या एका शोरुम जवळ एकटाच असल्याची मुलीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली. मुलीचे नातेवाईक हातात शस्त्र घेऊन त्याठिकाणी पोहचले आणि सोमावर हल्ला केला. यात सोमाचा जागीच मृत्यू झाला. 

सोमाच्या हत्येची माहिती मिळताच त्याचं कुटुंबही संतापलं. मुलीच्या नातेवाईकांनी सोमाची हत्या केल्याचा बदला घेण्यासाठी ते रुपलेखाच्या घरी पोहचले. यावेळी रुपलेखाची आई घरी होती. सोमाच्या कुटुंबियांनी तिच्याशी वाद घालत तिला मारहाण केली. यात रुपलेखाच्या आईचाही मृत्यू झाला. 

एकाच दिवसात झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जामनगर परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची माहिती मिळताच एसपी प्रेमसुख डेलू स्वतः घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या तपासात काही आरोपींची नावं समोर आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

Read More