Marathi News> भारत
Advertisement

काहींना खूश करण्यासाठी कारवाई – कार्ती चिदंबरम

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अखेर अटक. यावर मुलगा कार्ती यांनी हल्लाबोल केला आहे. 

काहींना खूश करण्यासाठी कारवाई – कार्ती चिदंबरम

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अखेर सीबीआयने त्यांच्या दिल्लीतील जोरबागमधील घरातून अटक केली आहे. पी चिदंबरम मागील २७ तासांपासून अटकेच्या समन्सनंतर गायब होते. त्यानंतर त्यांनी अकबररोडच्या काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आपल्याला आणि माझ्या मुलाला फसवण्यात येत असल्याचे म्हटले होते. तसेच जाणून बुजून यात गोवण्यात आल्याचा आरोप केला. माझ्यावर कोणताही गुन्हा नाही, असे ते म्हणालेत. यावर पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांनी हे सर्व काहींना खूश करण्यासाठी चालले आहे, असा हल्लाबोल केला. तसे ट्विट त्यांनी केले आहे. 

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी राजधानी दिल्लीत त्यांच्या निवास्थानी सीबीआय पथक दाखल झाले होते. यावेळी निवसास्थानाबाहेर मोठ्याप्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ सुरू होता. आपण लपत नसल्याचे सांगत, वकिलांसोबत मिळून न्यायालयात लढण्याची तयारी करत असल्याचे पी चिदंबरम यांनी म्हटले. त्यानंतर ते तातडीने त्यांच्या निवास्थानी गेले होते. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पी चिदंबरम यांचे सुपूत्र कार्ती चिदंबरम यांनी हे सर्व नाटक केवळ काही जणांना खूश करण्यासाठी केले जात असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, तपास यंत्रणांकडून केले जात असलेले हे नाटक व तमाशा केवळ वातावरण निर्मितीसाठी आणि काहीजणांना खूश करण्यासाठी आहे. तसेच,  या संकटाच्या क्षणी पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचे आभारही मानले आहेत.

Read More