मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर बोईंग कंपनीचं ड्रिमलायनर डेथलायनर बनलंय का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. कारण जगभरात बोईंगच्या विमानांचे 6 हजार अपघात झाले आहेत. यामध्ये 9 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या भीषण अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान बोईंग कंपनीचं आहे. या अपघातानंतर बोईंग विमानांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अहमदाबाद अपघाताआधी सरकारी आकडेवारीनुसार जगभरात आतापर्यंत 6 हजार बोईंग विमानांचे अपघात झाले आहेत. यातील 415 अपघात अतिशय भीषण होते. यात जगभरात 9 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय.
जगभरात बोईंगचे सुमारे 6 हजार अपघात झाले असून यात जगभरात 9 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झालाय. 4 हजाराहून अधिक बोईंग 737-800 मॉडेलची विमानं वापरात असून आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत विमानांचा वापर केला जातो.
जगभरात सध्याच्या घडीला 4 हजाराहून अधिक बोईंग 737-800 मॉडेलची विमानं वापरत आहेत. सध्या आशिया, युरोप, उत्तर अमेरिकेत या विमानांचा सर्वाधिक वापर होतो. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात या विमानांचा अपघात होत असताना देखील दुर्लक्ष का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
राज ठाकरेंनी देखील अपघातग्रस्त बोईंग विमानासंदर्भात काही सवाल केले आहेत. बोईंग 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल अनेक तक्रारी आलेल्या असताना देखील कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
बोईंगच्या 'ड्रीमलाईनर' विमानाबद्दल खूप तक्रारी होत्या. 2013 ला पहिल्यांदा जपान एअरलाईन्सच्या विमानाला आग लागली. विमानाबद्दल अनेक तक्रारी येतच होत्या. त्यामुळे 2020 ते 2023 या काळात अनेकदा विमानांच उड्डाण थांबवलं. जानेवारी 2013ला तर अमेरिकेपासून युरोपपर्यंत जवळपास सगळ्या मोठ्या विमान प्राधिकरणांनी जवळपास 3 महिने उड्डाण खंडित केलं. 2013ला भारतात डीजीसीएने देखील काही काळासाठी या विमानाचं उड्डाण खंडित केलं जर ड्रीमलाईनर बद्दल इतक्या तक्रारी आहेत हे माहित असून सुद्धा आपण ही विमानं का वापरू देत होतो? डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली? थोडक्यात जगभरात जेंव्हा ड्रीमलाईनरबद्दल तक्रारी होत्या त्याच दरम्यान आपण हे विमान ताफ्यात आणलं.
ड्रीमलाईनरची सेवा 2020 ते 2023 च्या काळात अनेकदा जगभरात तांत्रिक कारणांमुळे खंडित असं असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी 40 हुन अधिक ड्रीमलायनर विमानांची ऑर्डर दिली. सगळ्याला सरकारने परवानगी का दिली? डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला? मी जे सगळं मांडलं आहे त्या विषयी न्यूयॉर्क टाइम्स, वॉलस्ट्रीट जर्नल, अल-जझीरा यामध्ये छापून आलं आहे. अल-जझीराने तर ड्रीमलायनरबद्दल एक डॉक्युमेंट्रीपण केली आहे, त्याची युट्युब लिंक पण सोबत दिली आहे. बोईंग विमानांचा सातत्यानं अपघात होत असल्यानं बोईंग 737 मॅक्सची तपासणी करण्यात आली. त्यात MCAS संबंधित समस्या आढळून आली. त्यामुळे याच MCAS मुळे वारंवार अपघात होतायत का? असा सवाल भारतातूनच नव्हे तर जगभरातून उपस्थित करण्यात येतोय.