Marathi News> भारत
Advertisement

जम्मूमध्ये पुन्हा आढळले ड्रोन; सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा

दहशतवादी भारतीय सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत...

जम्मूमध्ये पुन्हा आढळले ड्रोन; सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा

जम्मू  : एअरफोर्स स्टेशनवर झालेल्या  ड्रोन हल्ल्यानंतर बुधवारी सलग चौथ्या दिवशी सुरक्षा कर्मचार्‍यांना दोन ड्रोन आढळून आले आहेत. बुधवारी पहाटे 5च्या सुमारास कालूचक आणि कुंजवानी भागात ड्रोन फिरताना दिसले. सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कालूचकच्या गोस्वामी एन्क्लेव्हजवळ आकाशात एक संशयास्पद वस्तू उडताना दिसली. त्याचप्रमाणे कुंजावनी जवळ देखील एक ड्रोन उडत होते. हे ड्रोन संदिग्ध ड्रोन जवळपास 800 मीटर उंच उडत असल्याची माहिती मिळत आहे. 

 गेल्या चार दिवसांत जम्मूमध्ये सैन्याच्या छावण्या असलेल्या परिसरामध्ये कमीतकमी सात ड्रोन आढळून आले आहेत.  यापूर्वी रविवारी रात्री कालूचक मिलिट्री स्टेशनजवळ दोन ड्रोन दिसले होते. एअरफोर्स स्टेशनवर ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा दलाला सतर्क राहाण्याचा इशारा दिला आहे. आकाशात ड्रोन दिसताचं तात्काळ ड्रोनच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. त्यामुळे ती माघारी गेली.

जम्मूच्या एअरफोर्ट स्टेशनवर शनिवारी रात्री झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपावण्यात आला असून त्यामागे काही मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दहशतवादी भारतीय सैन्य तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि यासाठीच हा हल्ला हवाई दलाच्या स्टेशनवर घडला, असं देखील सांगितलं जात आहे. 

Read More