Marathi News> भारत
Advertisement

'अजून एक राऊंड मारु का?,' ड्रंक ड्रायव्हरचा महिलेला चिरडल्यानंतर सवाल, मित्र कारमधून उतरत म्हणाला 'हा साला...', VIDEO व्हायरल

मद्यपान केलेल्या तरुणाने महिलेला कारखाली चिरडल्यानंतर कारमधून उतरुन अजून एक राऊंड हवा आहे का? अशी विचारणा केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

'अजून एक राऊंड मारु का?,' ड्रंक ड्रायव्हरचा महिलेला चिरडल्यानंतर सवाल, मित्र कारमधून उतरत म्हणाला 'हा साला...', VIDEO व्हायरल

गुजरातच्या वडोदरामधील करेलीबाग येथे एका चालकाने मद्यपान केलेल्या अवस्थेत काही जणांना कारने उडवलं. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकाने तिथे उभ्या काही वाहनांनाही धडक दिली. सीसीटीव्हीत ही सगळी घटना कैद झाली आहे. अपघातानंतर चालकाने बाहेर उतरुन तिथे उपस्थित गर्दीला अजून एक राऊंड हवा आहे का? अशी विचारणा केली. 

वडोदरा शहराच्या करेलीबाग येथे वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. तिथे उपस्थित साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, काळ्या रंगाची कार भरधाव वेगात धावत होती. या कारने दोन दुचाकींना धडक दिली. तसंच तिथे उभ्या काही नागरिकांनाही उडवलं. धडक इतकी जोरदार होती की, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेची ओळख हेमालीबेने पटेल अशी झाली पटली आहे. यावेळी तीन ते चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची नावं जैनी (12), निशाबेन (35) आणि 40 आणि 10 वर्षांचे दोन अज्ञात आहेत. 

अपघातानंतर सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर पोलीस आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी चालक मद्यावस्थेत आपल्या कारमधून बाहेर आला. व्हिडीओ फुटेजनुसार, चालकाने काळ्या रंगाचं टी-शर्ट घातलं असून त्याला अजिबात शुद्ध नव्हती आणि आरडाओरड करत होता. तो वारंवार, 'आणखी एक राऊंड हवा आहे का?', 'ओम नम; शिवाय' असं ओरडत होता. 


व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, चालकासह त्याचा मित्रही बसला होता. अपघात झाल्यानंतर तो कारमधून बाहेर आला आणि हा मूर्ख आहे, याच्याशी आपला काही संबंध नाही असं सांगितंल. अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने कारवाई केली आहे. सहपोलीस आयुक्त लीना पाटील यांनी सांगितलं आहे की, चालक मद्यावस्थेत होता आणि आता त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

"चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस आहे," असं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. दरम्यान चालकाने ड्रग्ज वैगेरे घेतले होते का याचाही पोलीस तपास करत आहेत. 

Read More