Marathi News> भारत
Advertisement

बॉलिवूडचे कलाकार भीतीपोटी मोदींचे समर्थन करतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड कलाकारांकडून मिळणारे समर्थन हे भीतीपोटी दिले जात आहे.

बॉलिवूडचे कलाकार भीतीपोटी मोदींचे समर्थन करतात

नवी दिल्ली : 2019 ची लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सर्वच पक्षातून नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. बॉलिवूडचे कलाकार भीतीपोटी मोदींचे समर्थन करत असल्याचे माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. प्रिया दत्त यांनी बॉलिवूड कलाकारांकडून मोदी सरकारला दिले जाणारे समर्थन या ट्रेंडविषयी चर्चा केली. सरकारला दिल्या जाणाऱ्या या समर्थनामागे भीती असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया दत्तने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉलिवूड कलाकारांकडून मिळणारे समर्थन हे भीतीपोटी दिले जात आहे. प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. या मतांचा समाजावर प्रभाव पडत असतो. त्यामुळे प्रत्येकाला आपले मत स्पष्टपणे मांडण्यात आले पाहिजे असे प्रिया दत्त यांनी म्हटले आहे. तुम्हाला वाटत नाही का या समर्थनामागे भीती आहे? मी असाच विचार करते. नाहीतर असा इतका मोठा बदल कसा झाला? असा सवालही प्रिया दत्त यांनी केला आहे. 

प्रिया दत्त बॉलिवूड अभिनेते सुनिल दत्त आणि नरगिस यांची मुलगी आहे. प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  2014 रोजी झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. त्यानंतर यंदा होणाऱ्या 2019 सालच्या लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा पूनम महाजन आणि प्रिया दत्त आमने-सामने येणार आहेत. 

Read More