Marathi News> भारत
Advertisement

भारतातील सर्वात श्रीमंत रल्वे स्थानक! एका वर्षात कमावले 33370000000 रुपये; स्टेशनचे नाव जाणून शॉक व्हाल

भारतातील सर्वात जास्त कमाई करणारे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाची एका वर्षाची कमाई 33370000000 रुपये आहे. 

 भारतातील सर्वात श्रीमंत रल्वे स्थानक! एका वर्षात कमावले 33370000000 रुपये; स्टेशनचे नाव जाणून शॉक व्हाल

India Highest Earning Railway Station:  भारतीय रेल्वे सरकारची तिजोरी भरणारे माध्यम आहे. असचं एक स्टेशन आहे ज्याची वर्षाची कमाई 33370000000 रुपये इतकी आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत रल्वे स्थानक आहे. या स्टेशनचे नाव जाणून शॉक व्हाल. या रल्वे स्थानकातून लाखो प्रवासी करतात. यातूनच या रेल्वे स्थानकाची बक्कळ कमाई होते. 

भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज दोन कोटींहून अधिक लोक  रेल्वेने प्रवास करतात. भारतात 7308 पेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत. प्रवाशांच्या सोईसाठी बांधण्यात आलेली रेल्वे स्थानके ही रेल्वेसाठी उत्पन्नाचे एक प्रमुख मध्यम आहे. भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे ज्याने वर्षभरात   33370000000 रुपयांची कमाई केली. हे भारतातील सर्वात श्रीमंत रेल्वे स्थानक आहे. जाणून घेऊया हे रेल्वे स्थानक कोणते?

रेल्वे स्थानकांमधून रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपयांची कमाई करते.  स्टेशनवरील जाहिराती, दुकाने, प्लॅटफॉर्म तिकिटे, वेटिंग रुम इत्यादींमुळे रेल्वेला मोठा महसूल मिळतो.  भारतीय रेल्वेच्या महसुलाच्या बाबतीत विक्रम करणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत राष्ट्रीय राजधानीतील नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे अव्वल स्थानी आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात नवी दिल्ली रेल्वे स्थानकाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले. नवी दिल्ली रेल्वे स्थानकापासून रेल्वेला 3337 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नवी दिल्ली रेल्वे स्थानक सर्वाधिक महसूल मिळवणारे स्टेशन नाही तर भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.  भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या यादीत हावडा रेल्वे स्टेशन क्रमांकावर आहे. या स्थानकाचे वार्षिक उत्पन्न 12692 कोटी इतके आहे. हावडा रेल्वे स्टेशन हे सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे. 

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण भारतातील या रेल्वे स्थानकाने एका वर्षात 1299 कोटी रुपयांची कमाई केली.  कमाईच्या बाबतीत, तेलंगणाचे सिकंदराबाद रेल्वे स्थानक चौथ्या स्थानावर राहिले. या स्थानकाने 1276 कोटी रुपये कमावले.   महसूल निर्मितीच्या बाबतीत, दिल्लीतील आणखी एका रेल्वे स्थानकाने टॉप ५ मध्ये आहे. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाने कमाईच्या क्रमवारीत पाचवे स्थान पटकावले आहे. या रेल्वे स्थानकाने  2023-24 या आर्थिक वर्षात 1227 कोटी रुपये कमावले.  कमाईच्या बाबतीत नवी दिल्ली रेल्वे स्थानक पहिल्या क्रमांकावर आहे, तर प्रवाशांच्या संख्येच्या बाबतीत मुंबईचे सीएसटी रेल्वे स्थानक अव्वल स्थानावर आहे.  

 

Read More