Marathi News> भारत
Advertisement

दिल्लीत भूंकपाच्या धक्क्यामुळे लॉकडाऊन दरम्यान नाईलाजाने लोकं रस्त्यावर

आज नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले

दिल्लीत भूंकपाच्या धक्क्यामुळे लॉकडाऊन दरम्यान नाईलाजाने लोकं रस्त्यावर

नवी दिल्ली : आज नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गुरुग्राम आणि फरीदाबादमध्येही भूंकपाचे धक्के जाणवले. सायंकाळी सहाच्या सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवले. हा भूकंप इतका तीव्र होता की ते घरांमध्ये तो स्पष्टपणे जाणवला. बर्‍याच घरांमधील वस्तू हालत असल्याने लोकांना भीतीपोटी नाईलाजाने जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडावं लागलं. देशात सगळीकडे लॉकडाऊन लागू असल्याने 24 मार्चपासून लोकं घरातच आहेत. त्यानंतर देशात 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान दिल्लीत जाणवलेल्या या भूंकपाची तिव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवली गेली आहे. भूकंपामुळे अद्याप कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती आहे. भूकंपाचे केंद्रस्थान दिल्लीतच आहे. जमिनीपासून आठ किमी खाली भूंकपाचे केंद्र होते. यामुळे हा धक्का इतका जोरदार होता की, लॉकडाऊन दरम्यान ही लोकांना घराबाहेर पडावं लागलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले. आशा आहे की प्रत्येकजण सुरक्षित आहे. प्रत्येकजण सुरक्षित रहावे अशी मी प्रार्थना करतो.

यापूर्वी मागील वर्षी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या भागात भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू भारत-पाकिस्तान सीमेवर होते. त्या भूंकपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 3..3 मोजली गेली. त्याचे केंद्र लाहोरपासून 133 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक प्रभाव जम्मू-काश्मीरमध्ये दिसून आला होता.

Read More