Marathi News> भारत
Advertisement

कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाचे छापे

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील घर आणि कार्यालयावर आज ( शनिवार) सक्तवसुली संचालनालयाने छापे मारले.

कार्ती चिदंबरम यांच्या घरावर सक्तवसूली संचालनालयाचे छापे

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या नवी दिल्ली आणि चेन्नई येथील घर आणि कार्यालयावर आज ( शनिवार) सक्तवसुली संचालनालयाने छापे मारले.

दिल्ली आणि चेन्नईतील पाच ठिकाणांवर धाड

आयएनएक्स मीडियाप्रकरणी हे छापे मारण्यात आले आहेत. आयएनएक्‍स मीडिया निधीला एफआयपीबी अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी पी. चिदंबरम हे संबंधीत विभागाचे मंत्री होते. मुलाच्या कंपनीला फायदा मिळावा म्हणून अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी ही मंजुरी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे आज कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतील पाच ठिकाणांवर आज सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली.

छाप्यात काहीच न मिळाल्याचा कार्तीच्या वकिलांचा दावा

सकाळी ७ वाजता ईडीचे अधिकारी कार्ती यांच्या घरी पोहचले. या अधिकाऱ्यांनी सुमारे साडे तीन तास कार्ती यांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर सकाळी ११ वाजता हे अधिकारी निघून गेले. विशेष म्हणजे कार्ती देशाबाहेर असून त्यांच्या अनुपस्थितीत हे छापे मारण्यात आले आहेत. पी. चिदंबरम आणि कार्ती एकत्रच राहतात. दरम्यान, या छाप्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना काहीच मिळाले नसल्याचा दावा चिदंबरम यांच्या वकिलाने केला आहे.

Read More