Marathi News> भारत
Advertisement

कर्मचाऱ्यांवर दु:खाचा डोंगर,कॉल करून तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. 

कर्मचाऱ्यांवर दु:खाचा डोंगर,कॉल करून तब्बल इतक्या कर्मचाऱ्यांना दिला नारळ

मुंबई : कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना हातातले काम सोडून घरी बसावे लागले होते. त्यावेळची ती सर्वांत मोठी कर्मचारी कपात आहे. कोविड नंतर आता पुन्हा एकदा कर्मचारी कपात करण्यात आली आहे. तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. एका साध्या कॉ़लवरून त्यांचा राजीनामा मागितला गेला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.  

22 बिलियन डॉलर्सची स्टार्टअप कंपनी असलेल्या एडटेक कंपनीने 2500 कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीच्या मागणीत घट होत असल्याने बायजूसच्या समूह कंपन्यांच्या 2500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान एडटेक सेवांच्या मागणीत मोठी वाढ झाली होती, परंतु आता त्यांची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. अहवालानुसार, Byju's ने Toppr, WhiteHat Jr आणि त्याच्या विक्री आणि विपणन, ऑपरेशन्स, कंटेंट आणि डिझाइन टीममधील पूर्ण-वेळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.  

कॉलवर मागितला राजीनामा

टॉपरच्या बडतर्फ कर्मचार्‍यांनी सांगितले की, त्यांना सोमवारी कंपनीकडून कॉल आला आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. असं न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस कालावधी न देता कंपनीतून बडतर्फ केले जाईल, असे सांगण्य़ात आले. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉपरमधून सुमारे 300-350 कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आले, तर उर्वरित 300 कर्मचार्‍यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले किंवा त्यांना सुमारे काही महिन्यांपासून पगार मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सुमारे 600 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले, ज्यांचा कार्यकाळ यावर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या आसपास संपणार होता.

त्याचवेळी बायजू ग्रुपच्या व्हाईटहॅट ज्युनियरच्या आणखी एका फर्मनेही आपल्या 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.याशिवाय, एडटेक फर्म्स अनॅकॅडमी, वेदांतू, लिडो, फ्रंट्रो यांनी या वर्षी एकूण हजारो लोकांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे ही सर्वांत मोठी कर्मचारी कपात आहे.  

Read More