Marathi News> भारत
Advertisement

Education Loan घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्या; अन्यथा होऊ शकते अडचण

जर तुम्ही शैक्षणिक कर्जाच्या रिपेमेंटला व्यवस्थित हातळले नाही तर शिक्षण कालावधीत अडचणी येऊ शकतात. 

Education Loan घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या गोष्टी गांभीर्याने घ्या; अन्यथा होऊ शकते अडचण

मुंबई : देश आणि जगातील शिक्षणाची सिस्टिम पूर्णतः बदलली आहे. खर्चाच्या फॉरमॅटचा असो किंवा आणखी कोणता. सर्व सिस्टिम्समध्ये बदल होताना दिसत आहे. अशातच विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याची क्रेज वाढली आहे. जर तुम्ही शैक्षणिक कर्जाच्या रिपेमेंटला व्यवस्थित हातळले नाही तर शिक्षण कालावधीत अडचणी येऊ शकतात. 
देशातील सध्याच्या महागाईमध्ये कर्ज घेण्यावाचून पर्याय राहत नाही. जाणून घेऊ या. कर्ज फेडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

EMI कमी करण्यासाठी कालावधीवर लक्ष ठेवा
एखाद्या व्यक्तीने सिक्युर्ड एज्युकेशन लोन (Secured Education Loan)घेतले असेल तर, त्याचा कालावधी काहीसा दीर्घ असावा. त्यामुळे तुमचा EMI कमी होईल. तसेच तो भरण्यासाठी पूरेसा वेळ मिळेल. जोपर्यंत तुमचे शिक्षण सुरू आहे. तोपर्यत बँकेकडून मोराटोरिअम मिळते. परंतु तुमचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बँक तुमचे EMI सुरू करेल. अशातच तुम्ही मोराटोरिअमदरम्यान कर्जाचा काही हिस्सा भरल्यास तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

पार्ट टाईम जॉबवर फोकस करा
शिक्षणादरम्यान कर्ज भरण्याचे प्रयत्न करा. म्हणजेच शिक्षणासोबतच पार्ट टाइम नोकरी सुरू करा. त्यातून होणाऱ्या कमाईमुळे कर्जाचा भरणा करता येईल.

बचतीकडे लक्ष द्या
तुम्ही पार्ट टाईम जॉब सुरू केल्यानंतर कर्जाची काही रक्कम भरण्याचा प्रयत्न करा. तुमचा इतर खर्च जाऊन काही रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

भविष्याच्या आर्थिक गणिताकडे लक्ष ठेवा
शैक्षणिक कर्ज घेताना भविष्यातील आर्थिक जमा - खर्चांचे अंदाजे नियोजन करा. तसेच शैक्षणिक क्षेत्र निवडताना काळजीपूर्वक निवडा जेणेकरून शिक्षणानंतर लवकर नोकरी/व्यवसाय सुरू करता येईल.

Read More