Marathi News> भारत
Advertisement

Education News : 'बाबर क्रूर विजेता, अकबर...' आठवीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल; कारण काय?

Education News : शिक्षण विभागामध्ये गेल्या काही काळापासून सातत्यानं बदल होत असून, आता इयत्ता आठवीच्या सामाजशास्त्राच्या पुस्तकामध्येही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.   

Education News : 'बाबर क्रूर विजेता, अकबर...' आठवीच्या पुस्तकांमध्ये मोठे बदल; कारण काय?

Education News : भारतीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागील काही वर्षांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. भारताची संस्कृती आणि इतिहासासह तत्सम मुद्द्यांवरील अनेक धड्यांचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये करत परकीयांना आता शैक्षणिक संदर्भांमध्येही किमान स्थान दिलं जात असून, त्यांचं उदात्तीकरण केलं जात नसल्याचं पाहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एका बदलाचा समावेश झाला असून, यामध्ये काही नवे संदर्भ लक्ष वेधत आहेत. 

आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल 

NCERT नं इयत्ता आठवीच्या सामाजशास्त्राच्या पुस्तकात काही महत्त्वाचे बदल केले असून, उपलब्ध माहितीनुसार NCERT च्या नव्या धड्यांमध्ये बाबरचा उल्लेख क्रूर विजेता मा्हणून करण्यात आला आहे. तर, अकबर आणि औरंगजेबाच्या धड्यांमध्येसुद्धा बदल करण्यात आले आहेत. बाबर निर्दयी शासक, अकबर क्रूर पण सहिष्णू असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आलाय. तर औरंगजेब कट्टर धार्मिक आणि मंदिरं पाडणारा शासक असं वर्णन या पुस्तकात करण्यात आलं आहे.

एनसीईआरटीनं इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये महत्त्वाचे बदल केले असून या पुस्तकांमध्ये दिल्लीती मुघल शासन, त्यादरम्यान झालेली धार्मिक असहिष्णुता यांचीही उदारहणं देण्यात आली आहेत. जिथं अकबराचा उल्लेख करताना असहिष्णुतेसारख्या शब्दाचा वापर करत मंदिरं उध्वस्त करण्यासंदर्भातील उल्लेखांमध्ये औरंगजेबाचं नाव आढळतं. 

एकाएकी केलेल्या बदलांवर कोणतंही स्पष्टीकरण नाही 

सदरील बदल नेमके का करण्यात आले यासंदर्भात NCERT कोणतीही माहिती अथवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता NCERT यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या बदलांमुळं नव्या वादांना वाव मिळू शकतो, ज्यामुळं एनसीईआरटीनं या वादाची पूर्वकल्पना पाहता एक खास टीप्पणीसुद्धा लिहिली असून, 'भूतकाळातील घटनांसाठी वर्तमानात कोणाला दोषी ठरवू नये' असंही म्हटलं आहे. 

हेसुद्धा वाचा : RBI मोठा निर्णय घेण्यास सज्ज? Home Loan आणखी स्वस्त होण्याचे संकेत; नवी आकडेवारी पाहाच 

बदलांचं दुसरं सत्र... 

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये झालेले हे बदल नवे नसून, यापूर्वीसुद्धा या अभ्यासक्रमातील पुस्तकांमध्ये करण्यात आलेल्या बदलांनी अनेकांचंच लक्ष वेधत असंख्य चर्चांना वाव दिला होता. NCERT च्या पाठ्यपुकांमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचाही समावेश करण्यात आला होता. यासोबतच वीर अब्दुल हमीद यांच्याविषयी एका धड्याचा समावेश पाठ्यपुस्तकांमध्ये करण्यात आला. हमीद गे 4 ग्रेनेडियर मधील जवान (सीक्यूएमएच) होते.  एनसीईआरटी पुढे पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करते का आणि हे बदल नेमके कोणत्या धर्तीवर असतील यावरच आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. 

Read More