Marathi News> भारत
Advertisement

लोकसभा 2019 : यूपीत प्रियांका-सिंधिया यांच्यामध्ये 41-39 जागा वाटप

लोकसभा निवडणूक 2019 सोबतच संपूर्ण विधानसभा निवडणूक 2022 मध्ये  मजबूत प्रदर्शन करण्यासाठी कॉंग्रेस सज्ज 

लोकसभा 2019 : यूपीत प्रियांका-सिंधिया यांच्यामध्ये 41-39 जागा वाटप

लखनऊ : कॉंग्रेस महासचिव आणि उत्तर प्रदेश (पूर्व) प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत सोमवारी लखनऊमध्ये पोहोचले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी प्रियांका आणि ज्योतिरादित्य यांना पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या जागा वाटून देण्यात आल्या. हे दोघे मिळून उत्तर प्रदेशमध्ये भाजपालो जोरदार टक्कर देऊ शकतील असा विश्वास कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी पूर्णपणे प्रियांका गांधी यांच्यावरच असणार आहे. लोकसभा निवडणूक 2019 सोबतच संपूर्ण विधानसभा निवडणूक 2022 मध्ये त्या मजबूत प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

प्रियांका गांधी यांच्या जागा 

fallbacks

उन्नाव, मोहनलालगंज (आरक्षित), लखनऊ, रायबरेली, अमेठी, सुलतानपुर, प्रतापगढ़, जालौन (आरक्षित), झांसी, हमीरपुर, बांदा, फतेहपुर, कौशांबी (आरक्षित), फूलपुर, प्रयागराज, बाराबंकी (आरक्षित), फैजाबाद, अंबेडकरनगर, कैसरगंज, गोंडा, डुमरियागंज, बस्ती, संतकबीर नगर, महाराजगंज, गोरखपुर, कुशीनगर, देवरिया, बांसगांव (आरक्षित), लालगंज (आरक्षित), आजमगढ़, घोसी, सलेमपुर, बलिया, जौनपुर, मछलीशहर (आरक्षित), गाजीपुर, चंदौली, वाराणसी, भदोही, मीरजापुर, रॉबर्ट्सगंज (आरक्षित)

ज्योतिरादित्य यांच्या जागा 

fallbacks

सहारनपुर, कैराना, मुजफ्फरनगर, बिजनौर, नगीना (आरक्षित), मुरादाबाद, रामपुर, संभल, अमरोहा, मेरठ, बागपत, गाजियाबाद, गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर (आरक्षित), अलीगढ़, हाथरस (आरक्षित), मथुरा, आगरा (आरक्षित), फतेहपुर सीकरी, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, बदायूं, आंवला, बरेली, पीलीभीत, शाहजहांपुर (आरक्षित), खीरी, धौरहरा, सीतापुर, हरदोई (आरक्षित), मिश्रिख (आरक्षित), फर्रुखाबाद, इटावा (आरक्षित), कन्नौज, कानपुर, अकबरपुर, बहराइच (आरक्षित), श्रावस्ती 

वाराणसी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदीय क्षेत्र आहे. इथे राजकीय वातावरण तयार करण्याची जबाबदारी प्रियांका गांधी वाड्रा यांच्यावर आहे.  यासोबतच गोरखपूर, फुलपूर सारख्या महत्त्वाच्या जागा देखील प्रियांका गांधी यांच्या वाट्याला आल्या आहेत. 'उत्तर प्रदेशमध्ये पक्ष उभा करण्याचे काम मी प्रियांका आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांना दिले आहे', असे राहुल गांधी यांनी सोमवारी म्हटले होते.  'लोकसभा निवडणूकीत चांगले प्रदर्शन झाले पाहीजे त्यासोबतच विधानसभा निवडणूकीतही कॉंग्रेसचे सरकार बनायला हवे', असे आवाहनही राहुल यांनी यावेळी केले. 

Read More