PIB Fact Cheack : सोशल मीडियावर सध्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. पण बऱ्याचदा लोक चुकीची किंवा अर्धवट माहिती असलेली बातमी देखील न पाहता शेअर करतात. अश्याच एका व्हायरल sms ला काही लोक बळी गेल्याचे दिसून आले आहे. सध्या Social Media वर एका वृत्तपत्राचे कटिंग व्हायरल (photo viral) होत आहे. (Election Commission will deduct Rs 350 from their bank account if they do not vote)
ज्यामध्ये असे म्हटंले जात आहे की, जर एखाद्या मतदाराने लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मतदान केले नाही तर निवडणूक आयोग त्यांच्या बँक खात्यातून (Bank Account) 350 रुपये कापतील. मतदानाचा अधिकार प्रत्येकाला असतो पण जर कोणी मतदान नाही केल तर त्याच्या बँक खात्यातून पैसे कापले जाणार का? तर चला मग पाहू या बातमीच्या व्हायरल होण्यामागचे खरे सत्य आहे तरी काय?
दावा: लोकसभा चुनाव में जो मतदाता अपने मताधिकार का प्रयोग नहीं करेंगे, चुनाव आयोग द्वारा उनके बैंक खातों से ₹350 काट लिए जाएंगे।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 16, 2022
यह दावा फर्जी है।
@ECISVEEP द्वारा ऐसा कोई निर्णय नहीं लिया गया है।
ऐसी भ्रामक खबरों को शेयर न करें।
https://t.co/ceQFBot8Sq pic.twitter.com/iTzAyRrxsL
#FakeNewsAlert
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) November 29, 2021
It has come to our notice that the following fake news is again being circulated in some whats app groups and social media. @PIBFactCheck https://t.co/FEtIhgzJ7N pic.twitter.com/UVPpoDqOHh
PIB Fact Cheack मध्ये काय आले समोर...
सोशल मीडियावर (social media) एका वृत्तपत्राचे कटिंग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असे म्हटंले जात आहे की जर एखाद्या मतदाराने लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) मतदान केले नाही तर निवडणूक आयोग त्याच्या बँक खात्यातून (Bank Account) 350 रुपये कापतील.
पण या व्हायरलचा PIB ने खुलासा केला असून त्यात असे कळले की ही फेक न्यूज (fake news) असून त्यात केलेले सर्व दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेतला नाही. पुढे PIB ने सांगितले की अशा बातम्या कृपया शेअर (share) करु नको. त्यानंतर निवडणूक आयोगाने एक ट्वीट करत ही व्हायरल होणारी बातमी खोटी आहे असल्याचे सांगितले आहे.
2019 ला ही बातमी व्हायरल होती
2019 ला ही अशीच एक बातमी सोशल मीडियावर आणि व्हाट्सॅप ग्रुपवर (whatsapp group ) व्हायरल झाली होती असं निवडणूक आयोगाने सांगितले. निवडणूक आयोगाने एक ट्वीट करत त्या बातमीत असलेले दावे खोटे आहेत. असे सांगितले आहेत.