Marathi News> भारत
Advertisement

कोरोना संकटात वीज बिलाबाबत सरकारचा निर्णय

सरकारने सर्व वीज कंपन्यांसाठी मदत पॅकेज जाहीर केलं आहे.

कोरोना संकटात वीज बिलाबाबत सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अनेक कंपन्या, कारखाने बंद असल्याने लोक घरीच आहेत. हीच बाब लक्षात घेता, सरकारने सर्व वीज कंपन्यांसाठी मदत पॅकेज जाहीर केलं आहे. त्यासोबतच 24 तास वीज उपलब्ध करुन देणं आणि बिल भरण्यासाठी विलंब लागल्यास कोणताही चार्ज घेतला जाणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर वीज बिलात कपात होण्याची शक्यता आहे. 

CERCकडून (सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेगुलेटरी कमीशन) वीज डिस्ट्रिब्यूशन कंपन्यांनावर लेट चार्ज लावण्यात येणार नाही. सरकारच्या या निर्णयानंतर डिस्ट्रिब्यूशन कंपन्या ग्राहकांकडूनही लेट चार्ज आकारणार नाही. जर ग्राहक या दरम्यान वीज बिल भरु शकत नसल्यास तो पुढे ते भरु शकतो. त्यावर कोणताही अधिक दर वसूल केला जाणार नाही. या सर्व निर्णयांद्वारे देशात 24 तास, सातही दिवस वीज उपलब्ध करुन देण्याचं सरकारचं लक्ष्य आहे. 

त्याशिवाय, वीज वितरण कंपन्या, वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना थकित पैसे नंतरदेखील भरू शकतात. त्यांना त्वरित पैसे भरण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. वीज वितरण कंपन्यांना एडवान्स पेमेंटची रक्कमही केवळ 50 टक्केच द्यावी लागणार आहे.

Read More