वैशाली : Elephant Swam One Kilometre in Bihar's Ganga River: बिहारच्या काही भागात मुसळधार पावसात मंगळवारी एक हत्तीने आपल्या मालकाला गंगेच्या पूरातून वाचवले. ही घटना वैशालीच्या राघोपूर भागातील आहे.
गंगा नदीत अचानक पाणी वाढल्याने माणूस हत्तीसोबत अडकला. व्हिडीओमध्ये माहूतसोबत हत्ती नदीचे वेगवान पाणी ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या पाण्यात हत्ती पूर्णपणे पाण्यात बुडताना दिसत आहे. थोडावेळासाठी असे वाटले की, दोघेही किनाऱ्यावर पोहोचू शकणार नाहीत. मात्र, शेवटी हत्ती आणि माहुत नदीच्या एका किनाऱ्यावर सुखरूप पोहचतात.
An Elephant and Mahaut braved the swollen river Ganga for 3 kilometers to save their lives in Raghopur of Vaishali district.
— The Tall Indian (@BihariBaba1008) July 13, 2022
उफनते पानी से हाथी और महावत की जंग, तस्वीरें बिहार के राघोपुर की हैं. #Bihar #flood #vaishali #elephant #ganga #Rescue pic.twitter.com/dLsIuipcOz
पाण्यात पोहत हत्तीने माहूतचा वाचवला जीव
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्थानिक लोकांनी खुलासा केला की रुस्तमपूर घाट ते पाटणा केथुकी घाट दरम्यान, एक किलोमीटर अंतरावरापर्यंत हत्ती पोहत होता.
गंगा नदीला अचानक पूर आल्याने माहूत आणि हत्ती पूराच्या पाण्यात अडकले होते. परंतू हत्तीला वाचवण्यासाठी मोठ्या बोटीचे पैसे माहुतकडे नव्हते. त्यामुळे त्याने हत्तीसह नदी पार करण्याचा निर्णय घेतला. माहूत हत्तीच्या खांद्यावर बसला होता. अशावेळी मोठ्या हिंमतीने हत्तीने पूराच्या पाण्यातून स्वतःचा तसेच मालकाचा जीव वाचवला.