Ahmedabad Rath Yatra 2025: देशभरात आज भगवान जगन्नाथांच्या (Lord Jagannath) रथयात्रांचे (Rath Yatra) आयोजन मोठ्या श्रद्धेने होत आहे. गुजरातमधील अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान एक हत्ती (Ahmedabad) अचानक अनियंत्रित झाला आणि त्याने अचानक त्याची दिशा बदलली. हत्तीने दिशा बदलामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने वनविभागाच्या सतर्कतेमुळे हत्तीवर लवकरच नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
रथयात्रा सुरू असताना हत्ती अचानक मार्ग बदलून इकडे-तिकडे धावू लागला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की काही क्षणांसाठी वाटलं, तो हत्ती आपल्यावर धावून येईल. परिस्थिती गंभीर बनू नये म्हणून पोलिस व वनविभागाने गर्दीला शांत राहण्याचं आणि शिट्ट्या न वाजवण्याचं आवाहन केलं. काही वेळातच प्रशासनाने परिस्थिती आटोक्यात आणली.
यंदाच्या रथयात्रेला एक खास क्षण लाभला. पहिल्यांदाच भगवान जगन्नाथांच्या रथाला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सकाळी 5 ते 6 च्या दरम्यान भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रामातेच्या मूर्ती रथावर विराजमान करण्यात आल्या. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पारंपरिक पाहिंड विधीने रथयात्रेला शुभारंभ केला. यावेळी सोनेरी झाडूने रस्ता स्वच्छ करण्यात आला, ही परंपरा जगन्नाथ रथयात्रेचा महत्त्वाचा भाग मानली जाते.
Watch | Union Home Minister Amit Shah performed Mangala Aarti and had darshan of Lord Jagannath ahead of the Rath Yatra in Ahmedabad earlier this morning. pic.twitter.com/8lcvXtfJqB
— DeshGujarat (@DeshGujarat) June 27, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या कुटुंबासोबत जमालपूरच्या जगन्नाथ मंदिरात मंगला आरतीमध्ये सहभाग घेतला. रात्री सुमारे 8:30 वाजता भगवान पुन्हा मंदिरात परतणार आहेत.
पुरीमध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राच्या रथांना संध्याकाळी 4 वाजता बाहेर काढून ओढलं जाणार आहे. उदयपूरमध्ये सुमारे 80 किलो चांदीच्या रथात भगवान विराजमान होतील. पश्चिम बंगालच्या दीघा भागातही रथयात्रेचा उत्सव साजरा केला जात आहे.
VIDEO | Gujarat: Three elephants go out of control during Jagannath Rath Yatra in Ahmedabad.
— Press Trust of India (@PTI_News) June 27, 2025
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/HYWt1hC4sX
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक सध्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये सर्जरीनंतर विश्रांती घेत आहेत. मात्र रथयात्रेच्या निमित्ताने त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवरूनच व्हिडीओ मेसेजमधून सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले, "भगवान जगन्नाथाच्या या पावन रथयात्रेच्या दिवशी सर्व देशवासीयांना आणि ओडिशावासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो."