Marathi News> भारत
Advertisement

जम्मू काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा , घुसखोरीचा डाव उधळला

 दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा  तंगधार येथे करण्यात आलाय.

जम्मू काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा , घुसखोरीचा डाव उधळला

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठं यश आलयं. दहशतवादी कारवाया करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा  तंगधार येथे करण्यात आलाय. त्यामुळे घातक हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळण्यात आलाय. दरम्यान आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता लष्कराकडुन वर्तविण्यात येत आहे. परिसरात लष्कराकडून शोधमोहीम सुरु असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. 

Read More