एका परदेशी क्लायंटचे ऑफिसमध्ये चक्क नृत्य सादर करुन स्वागत करण्यात आला. हा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओमुळे ऑनलाइन प्रचंड संताप व्यक्त झाला आहे.
रेडिट तसेच एक्स वर सध्या व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये संपूर्ण टीम 'किल्ली किल्ली' या तेलुगू गाण्यावर एकल नृत्य करताना दिसत आहे. एका कर्मचाऱ्याने लोकप्रिय बॉलीवूड ट्रॅक 'मैं तेरा बॉयफ्रेंड'वर या गाण्यावर परफॉर्म केलं आहे. हे सगळं पाहून त्यांचा फॉरेन क्लाइंट इम्प्रेस झाल्याच दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे फॉरेन क्लाइंट प्रभावित होऊन शेवटी टीममध्ये सामील होतात.
वोक एमिनंट या एक्स अकाउंटने पोस्ट केलेला हा व्हिडिओ एका टीकात्मक कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे: “भारताने कॉर्पोरेट ऑफिसेसचे अशा पद्धतीचे छपरीकरण थांबवावे. ऑफिसमध्ये भारतीय मुली नाचत आहेत आणि परदेशी क्लायंटचे स्वागत करत आहेत आणि क्लायंटलाही नाचण्यास भाग पाडले जात आहे हे पाहणे खूप दयनीय आहे. अशा पद्धतीच्या व्हिडीओमुळे भारतीय आणि त्यांच्या कामाची चुकीची छाप इतर देशांवर पडेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
India should stop chaprification of corporate offices
— Woke Eminent (@WokePandemic) July 21, 2025
This is so pathetic to see Indian girls dancing in office an d welcoming a foreign client and the becahra client also forced to dance.
Such showcasing will only make other countries feel Indian offices are causal and not… pic.twitter.com/gpA9kXY4GJ
पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये, काही युझर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यामध्ये संमिश्र अशी भावना आहेत. काहीजण म्हणतात की, हा एक टीम-बिल्डिंग प्रकार आहे, तर काहींनी ते अव्यावसायिक असल्याचं म्हटले आहे.
अनेकांनी याला "दयनीय" म्हटले, पुढे म्हटले: "हे लाजिरवाणे आहे. त्यांना अशा प्रकारच्या नृत्य दृश्य थांबवण्याची गरज आहे. अशा पद्धतीने ऑफिसमध्ये नाचणे आणि हे दृश्य पाहणे खूपच वाईट आहेत." दुसऱ्याने म्हटले, "अधीनता ही मनाची स्थिती आहे. परदेशी, राजकारणी, नोकरशाही किंवा अगदी व्यावसायिकांसाठी."
"हे भयानक आणि लाजिरवाणे आहे! मी अशा कंपन्यांचा भाग आहे ... असं म्हणत एका युझरने आपली भावना व्यक्त केली आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे? तसेच त्या व्हिडीओची पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.