Marathi News> भारत
Advertisement

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! EPFO खातं असलेल्यांना होणार 4 लाखांचा फायदा; नेमका निर्णय काय समजून घ्या

EPFO Alert Good News For Common People: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी ईपीएफओसंदर्भात मोठी घोषणा केली.

मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! EPFO खातं असलेल्यांना होणार 4 लाखांचा फायदा; नेमका निर्णय काय समजून घ्या

EPFO Alert Good News For Common People: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओच्या सदस्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने आता ईपीएफओ खातेदारांना त्यांच्या पीएफ फंडामधून अगाऊमध्ये अधिक पैसे काढण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे. पीएफ खात्यातील पैसे काही गरजेसाठी काढून घ्यायचे असल्यास आता सदस्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही. सरकारने ऑटो सेटलमेंटची मर्यादेमध्ये मोठी वाढ केली आहे. ही रक्कम 1 लाखांवरुन 5 लाख रुपये करण्यात आली आहे. 

करोना काळात सुरु करण्यात आलेली ही सुविधा

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी मंगळवारी, 24 जून 2025 रोजी ही माहिती दिली. करोना साथीच्या काळात काळात लोकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतील, यासाठी ईपीएफओने प्रथम अॅडव्हान्स क्लेमसाठी ऑटो सेटलमेंट सिस्टम सुरू केली होती. पूर्वी या सोयीअंतर्गत एक लाख रुपये काढण्याची मर्यादा होती. मात्र ही आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

अशा लोकांना होणार भरपूर फायदा

ज्यांना अचानक आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासते अशा लोकांना यामुळे खूप फायदा होईल, असं सांगितलं जात आहे. मांडवीय यांनी ही घोषणा केल्यानंतर या बातमीवर सोशल मीडियावरुन सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचं दिसून आलं. अनेकांनी ईपीएफओने घेतलेला हा निर्णय कौतुकस्पद असल्याचं म्हटलं आहे. "ज्यांना तातडीने पैशांची गरज आहे त्यांच्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे ऑटो सेटलमेंटचा हा निर्णय म्हणजे मोठा दिलासा आहे. ईपीएफओने घेतलेला हा निर्णय हे एक पाऊल उत्तम असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावरुन म्हटलं आहे. बऱ्याचदा घरातील एखादा लग्नासारखा मोठा सोहळा, घर खरेदी, कर्ज फेडणे, शिक्षणसाठी, आरोग्यविषय खर्चासाठी ईपीएफओमधील पैसे काढले जातात.

18 ते 25 वयोगटातील तरुणांचा मोठा सहभाग

ईपीएफओच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत. मार्च 2025 च्या तुलनेत ही वाढ 31.31 टक्के इतकी आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2024 च्या तुलनेत आताची वाढ ही 1.17 टक्के जास्त आहे. यामध्ये सर्वात जास्त सहभाग 18 ते 25 वयोगटातील तरुणांचा आहे. केवळ या वयोगटात 4.89 लाख लोक ईपीएफओमध्ये सामील झाले, जे एकूण नवीन सदस्यांच्या 57.67 टक्के आहेत.

महाराष्ट्रातून सर्वाधिक सदस्य

राज्यनिहाय आकडेवारी पाहता, महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकत सर्वाधिक नवीन पीएफ सदस्य जोडले आहेत. 

Read More