EPFO New Rule : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) त्या वतीनं सर्वच पगारदार वर्गासाठी (PF) प्रॉव्हिडेंट फंडची सुविधा दिली जाते. कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दर दिवशी जमा होणाऱ्या रकमेतूनच काही रक्कम कापून ते पैसे या खात्यावर जमा केले जातात. जेणेकरून उतारवयात आणि त्याहूनही निवृत्तीनंतर हीच रक्कम कर्मचारी वर्गाला त्यांची आर्थिक गरज भागवण्यासाठी वापरता येईल.
पीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या वेतनाच्या 12 ट्क्के रक्कम जमा केली जाते. तितकीच रक्कम कंपनीकडूनही खात्यावर जमा केली जाते. निवृत्तीनंतरच नव्हे, तर आर्थिक निकड असल्यासही पीएफ खात्यावर जमा असणारे पैसे काढण्याची सुविधा दिली जाते. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही रक्कम काढता येते, जिथं खातेधारकानं प्राथमिक अर्ज देणं गरजेचं असतं.
मागील काही वर्षांमध्ये पीएफ खात्याशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी हे व्यवहार शासनानंच अधिक सोपे करण्यावर अधिक भर देत आता त्यातील एका नियमात बदल केला आहे.
पीएफ खात्यासंदर्भातील नव्या नियमानुसार आधीच्या किंवा पुढील नोकरीच्या सर्विस पिरियडमध्ये सर्वसाधारण ओवरलॅपिंग होत असल्यास ईपीएफओकडून पीएफसाठी केलेला अर्ज बाद अर्थात रिजेक्ट केला जात नाही. 20 मे 2025 रोजी ईपीएफओनं यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं असून, या नियमाची माहिती दिली, ज्याचा फायदा हजारो पीएफ खातेधारकांना होणार आहे.
EPFO च्या माहितीनुसार दोन कंपन्यांच्या सर्विस डेट्समध्ये ओवरलॅपिंग असल्यास आता पीएफचा क्लेम बाद केला जाणार नाही. ईपीएफओनं दिलेल्या माहितीनुसार ओवरलॅपिंग सर्विसमुळं ट्रान्सफर क्लेम सहजपणे रद्दबातल ठरवला जाऊ नये. अनेकदा इथं काही प्रामाणिक कारणंसुद्धा असू शकतात.
नव्या परिपत्रकानुसार कोणत्याही निवृत्तीवेतनाच्या दाव्यामध्ये ओवरलॅपिंग तारखा आढळल्यास स्थानिक कार्यालयांकडून हा दावा फेटाळला जाऊ शकत नाही. किंबहुना त्यासाठी क्लेरिफिकेशन मागितलं जाईल. याची जबाबजारी ट्रान्सफर ऑफिसकडे सोपवण्यात आली असून, क्लेम परतवून न लावता ही प्रक्रिया पुढे नेत महत्त्वाच्या प्रकरणांमध्येच स्पष्टीकरण मागवावं आणि गोष्टींची स्पष्टोक्ती झाल्यानंतरच क्लेम सेटल करावा असंही स्पष्ट करण्यात आलं.