EPFO New Rule Update : नोकरदार वर्गाला (Salaried Class) ज्याप्रमाणे महिन्याला खात्यात येणाऱ्या पगाराप्रमाणं खात्यातून जाणाऱ्या कर्जाच्या हफ्त्याचीसुद्धा चिंता असते, त्याचप्रमाणं पीएफखात्यासंदर्भातील माहितीवरही याच नोकरदार वर्गाचं लक्ष असतं. कारण पगारातूनच कापलेली रक्कम त्यांच्या या खात्यात जमा होते, जी खऱ्या अर्थानं अडीनडीच्या काळात वापरता येते. याच खात्यासंदर्भात नुकतीच एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO)नं 1 ऑगस्टपासून ईपीएफओ खात्यासंदर्भात एक नवा नियम लागू केला आहे. त्यामुळं इथून पुढं युनिवर्सल अकाऊंट नंबर अर्थात (UAN) क्रमांक बनवायचा झालाच तर तो UMANG App च्या माध्यमातून ‘फेस ऑथेंटिकेशन’च्याच तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं बनवता येणार आहे. या नियमामुळं आता कर्मचाऱ्यांना स्वत:च हा युएएन क्रमांक बनवता येणार आहे.
UAN क्रमांकासाठी आता चेहऱ्याची ओळख महत्त्वाची असून त्यासाठी ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळं ही संपूर्ण प्रक्रिया अधिक सुकर आणि सुरक्षित असेल. या प्रणालीमध्ये खातेधारकांची माहिती थेट डेटाबेसवरून घेतली जाणार असून ती पूर्णपणे योग्य आणि खात्रीशीर आहे हेसुद्धा स्पष्ट होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती समोर आली.
कोणाही नोकरदार व्यक्तीला युएएन क्रमांक बनवायचा झाल्यास त्यांच्याकडे अधिकृत आधार क्रमांक, ओटीपीसाठी आधार क्रमांकाशी लिंक असणारा मोबाईल, मोबाईल क्रमांक, फेस स्कॅन प्रक्रियेसाठी RD App ची गरज भासणार आहे. या सर्व गोष्टींची पूर्तता करताच मोबाईलच्याच माध्यमातून काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होईल.
वरील संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी असून त्यात कोणतीही अडचण आल्यास Help desk किंवा EPFO च्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधून खातेधारक त्यांच्या तक्रारींचं निवारण करून घेऊ शकतात.
ईपीएफओने कोणता नवीन नियम लागू केला आहे?
कर्मचारी भविष्य निधी संगठनाने (EPFO) 1 ऑगस्ट 2025 पासून युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN) तयार करण्यासाठी UMANG अॅपद्वारे आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान (FAT) अनिवार्य केले आहे.
UAN तयार करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन का अनिवार्य आहे?
फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानामुळे UAN तयार करण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित, त्रुटीमुक्त आणि जलद होईल. हे तंत्रज्ञान थेट आधार डेटाबेसमधून माहिती घेते, ज्यामुळे माहितीची अचूकता सुनिश्चित होते आणि मॅन्युअल चुका टाळल्या जातात.
UAN तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?