Marathi News> भारत
Advertisement

'वफ्फ'चा अर्थ काय? 'वफ्फ बोर्डा'कडे भारतातील किती जमीन आहे? नेहरुंशी याचा काय संबंध?

What Does Waqf Means How Much Land It Owns In India: वक्फ सुधारणा विधेयकामुळे वफ्फ बोर्ड पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र 'वक्फ'चा नेमका अर्थ काय आणि त्यांच्याकडे किती जमीन आहे? पाहूयात...

'वफ्फ'चा अर्थ काय? 'वफ्फ बोर्डा'कडे भारतातील किती जमीन आहे? नेहरुंशी याचा काय संबंध?

What Does Waqf Means How Much Land It Owns In India: बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक आज दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये चर्चेसाठी येणार आहे. या विधेयकावरुन विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून हा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. सदर विधेयकामुळे वफ्फ बोर्ड (Waqf Board) पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र अनेकांना वफ्फ बोर्ड म्हणजे काय हेच ठाऊक नाही. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात वफ्फ बोर्ड हा प्रकार आहे तरी काय आणि तो काय करतो?

विधेयक मंजूर झालं तर...

वक्फ बोर्डाबाबत केंद्र सरकार मोठे पाऊल उचलणार असल्याचे संकेत 2024 मध्येच मिळाले होते. केंद्र सरकार वक्फ कायद्यात बदल करण्याच्या तयारीत असून त्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाईल अशी शक्यता होती. मात्र हे विधेयक आता म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलं जाणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास वक्फ बोर्ड यापुढे कोणतीही मालमत्ता ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करू शकणार नाही. अशा स्थितीत वक्फ म्हणजे काय आणि वक्फ बोर्डाकडे किती जमीन आहे हे पाहूयात...

वफ्फचा अर्थ काय?

वक्फ हा अरबी शब्द आहे. अल्लाह आणि इस्लामच्या नावावर धर्मादाय हेतूने दान केलेल्या संपत्तीला ‘वक्फ’ असं म्हणतात. स्थावर आणि जंगम दोन्ही मालमत्ता वफ्फच्या कार्यक्षेत्रात येतात. भारताच्या वक्फ मालमत्ता व्यवस्थापन प्रणालीमधील माहितीनुसार देशात एकूण 30 वक्फ बोर्ड आहेत. जवाहरलाल नेहरू सरकारने 1954 मध्ये 'वक्फ कायदा' केला. सन 1995 मध्येही वक्फ कायद्यातही बदल करण्यात आले, त्यानंतर प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वक्फ बोर्ड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली. या कायद्यात दाव्यापासून वक्फ मालमत्तेची देखभाल करण्यापर्यंत अनेक तरतुदी आहेत.

वफ्फकडे एकूण किती जमीन?

वक्फ बोर्डाकडे 2009 पर्यंत 4 लाख एकर जमीन होती, जी काही वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झाली. 2023 मध्ये अल्पसंख्याक मंत्रालयाने लोकसभेत सांगितले होते की डिसेंबर 2022 पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण 8 लाख 65 हजार 644 स्थावर मालमत्ता होत्या. म्हणजेच सध्या वक्फ बोर्डाकडे 8 लाख एकरपेक्षा जास्त जमीन आहे. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या बहुतांश जमिनीत मदरसे, मशिदी आणि कब्रस्तान आहेत. रेल्वे आणि कॅथोलिक चर्चनंतर, वक्फ बोर्ड हे देशातील जमिनीचे तिसरे सर्वात मोठे मालक आहे. 

कोर्टालाही हस्ताक्षेप करता येणार नाही?

वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आणि त्यांना दिलेले अधिकार याबाबत अनेकदा वाद झाले आहेत. वक्फ बोर्डाला कोणत्याही मालमत्तेची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि जर त्यांनी कोणत्याही मालमत्तेवर दावा केला तर त्यातून सुटका होणे कठीण होते. क्फ बोर्डाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयातही आव्हान देता येणार नाही असे वक्फ कायद्याच्या कलम 85 मध्ये म्हटले आहे.

Read More