Marathi News> भारत
Advertisement

ना धर्मग्रंथ, ना संविधान... 'या' पुस्तकाच्या जोरावर भारत पाकिस्तानविरुद्ध लढतोय युद्ध; सर्वसामान्यांना पाहायलाही मिळणं कठीण

Operation Sindoor Indian Pakistan War: सध्या संपूर्ण देशातील तणावपूर्ण परिस्थिती हातळण्यासाठी एका पुस्तकाचा आधार घेतला जात आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.

ना धर्मग्रंथ, ना संविधान... 'या' पुस्तकाच्या जोरावर भारत पाकिस्तानविरुद्ध लढतोय युद्ध; सर्वसामान्यांना पाहायलाही मिळणं कठीण

India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एका पुस्तकाच्या आधारे देशाचा कारभार हाकला जात आहे असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र हे पुस्तक म्हणजे कोणताही धार्मिक ग्रंथ किंवा देशाच्या लोकशाहीचा आधार असलेलं संविधान किंवा अगदी कायद्यासंदर्भातील पुस्तक नाही, हे समजल्यानंतर तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. या पुस्तकाच्या मर्यादित अवृत्त्या छापण्यात आल्या असून ते अगदी मोजक्या लोकांकडेच आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक सर्वसामान्यांना पाहताही येत नाही. याचसंदर्भात जाणून घेऊयात...

कसं आहे हे पुस्तक?

भारत आणि पाकिस्तान संघर्ष सुरु असताना भारतीय अधिकारी या परिस्थितीमध्ये एका पुस्तकाचा आधार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. 200 पेक्षा अधिक पानांचं हे निळ्या रंगाच्या पुस्तकाच्या मार्यादित आवृत्त्या उपलब्ध असून हे पुस्तक सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. मागील आठवड्यापासून देशभरातील प्रमुख नोकरशहांसाठी एक मार्गदर्शक म्हणून हे मॅन्युअल वापरला जात आहे. सशस्त्र संघर्षादरम्यान सरकारच्या विविध शाखांच्या प्रतिसाद आणि कार्यांचे वर्णन या मॅन्युअलमध्ये करण्यात आलं आहे. सध्या याच पुस्तकाच्या आधारे भारतीय अधिकारी पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. 

कोणाकडे आहे या पुस्तकाची प्रत?

'युनियन वॉर बुक 2010' (The Union War Book 2010) असं या मॅन्युअलच्या मूळ मर्यादित आवृत्तीचं नाव आहे. ही अवृत्ती इतकी गुप्त आहे की संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कॅबिनेट सचिवालयातील अधिकारी ज्यांनी ते तयार करण्यास आणि दरवर्षी अद्यतनित करण्यास मदत केली ते तुम्हाला मूळ पत्र कोणाकडे आहे हे सांगू शकत नाही. मात्र 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रालयांव्यतिरिक्त प्रत्येक राज्याच्या मुख्य सचिवांकडे या मॅन्युअलची एक प्रत आहे. अग्निशमन सरावापासून ते स्थलांतर आणि सायरनपर्यंत, संपूर्ण आपत्कालीन प्रतिसादाची यादी त्यांच्या डेस्कवर असलेल्या या पुस्तकाद्वारे निर्देशित करण्यात आली असल्याचं सांगितलं जात आहे.

नक्की पाहा हे फोटो >> पाकिस्तानने जो एअर बेस उडवल्याचा दावा केला तिथेच अचानक पोहोचले PM मोदी अन्...; पाहा Photos

या पुस्तकामुळेच स्पष्टता

"युद्धजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येकाने काय करावे याचं मार्गदर्शन या मॅन्युअलमधून प्रमुख अधिकाऱ्यांना केलं जातं. त्यामुळे कोणताही गोंधळ होत नाही. या पुस्तकामुळेच कोणाला कोणता प्रोटोकॉल पाळायचा याची स्पष्ट कल्पना आहे," असे नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रमुख नोकरशहाने 'हिंदुस्तान टाइम्स'ला सांगितले.

दर 15 वर्षांनी अपडेट केलं जात हे पुस्तक

प्रत्येक देशातील प्रशासकीय यंत्रणा युद्ध कालावधीमध्ये जैसे थे रहावी म्हणून युद्ध पुस्तकाची म्हणजेच 'वॉर बुक'ची संकल्पना वसाहतवादाच्या काळापासून सुरू आहे. मात्र या युद्ध पुस्तकाची नवी आवृत्ती दर 15 वर्षांनी प्रकाशित केली जाते. 2008 साली मुंबईत झालेल्या 26/11 च्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यामध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांसह 174 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2010 मध्ये आजच्या भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान सर्वांसाठी मार्गदर्शक बनलेले हे पुस्तक आकारास आले. 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी या पुस्तकाचे संकलन पाहिले होते.

Read More