IRCTC ticket booking fraud: भारतातील एक मोठा वर्ग कायमच प्रवासासाठी रेल्वे प्रवासाला पसंती देतो. किमान वेळात कमाल अंतर गाठत, खिशाला परवडणाऱ्या दरात (Indian Railway) रेल्वेकडून प्रवाशांसाठी प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते. प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांसाठी रेल्वेनं आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केलं असून, आता अतिशय कठोर पाऊल उचलत रेल्वे विभागाकडून तिकीट बुकिंगवर मक्तेदारी करणाऱ्या एजंटनाही धडा शिकवला आहे.
आतापर्यंत अनेकदा रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये अनधिकृत एजंट बनावट ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकांचा वापर करत बनावच अकाऊंट तयार करत होते. उदाहरणार्थ, जर एखाद्या प्रवाशाला दिल्लीहून आग्रा इथं जायचं आहे आणि तो तिकीट आरक्षणासाठी एजंटकडे गेला, तर तो एजंट 30 वेगवेगळया ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकांच्या माध्यमातून 30 बनावट खाती बनवेल. रेल्वे तिकीटासाठीचं आरक्षण सुरू झाल्यास तो याच अकाऊंटच्या माध्यमातून तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करेल. यामुळं त्या प्रवाशाला तिकीट मिळण्याची संधी वाढेल, मात्र यामुळं सामान्य प्रवाशांना मात्र तिकीट मिळण्याची शक्यता मात्र कमी होईल.
रेल्वेचं तिकीट बुक करू पाहणारे हे एजंट Disposable ईमेल आयडी तयार करत. ओटीपी आल्यानंतर ते अकाऊंट वेरिफाय करत आणि एकदा प्रोफाईल तयार झाली, की पुढची सर्व प्रणाली सोपी होऊन जात. ईमेल बंद असला तरीही तिकीट आरक्षित करणं एजंटना सहज शक्य होतं. एजंटच्या माध्यमातू एका प्रवाशासाठी किमान 30 खात्यांवरून तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळं संपूर्ण सर्व्हर आणि तिकीट बुकींग प्रणालीवर ताण येतो. एकाच वेळी 1000 एजंटकडून 30000 तिकीटांची बुकींग सुरु असल्यास नेमकं काय होईल? अगदी अशीच काहीशी परिस्थिती तिथं उदभवते.
आता मात्र हा काळाबाजार रोखण्यासाठी आयआरसीटीसीकडून कृत्रिम बृद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) आणइ मशिन लर्निंगचा वापर करत एक 'बॉट' तंत्रज्ञान विकसित तंत्रज्ञान करण्यात आलं आहे. ज्याच्या माध्यमातून बनावट प्रोफाईल, डिस्पोसजेबल ईमेल आयडी, बॉट्स यांची पुनर्पडताळणी करून बुकिंगआधीच त्यांना ब्लॉक केले जातात.
रेल्वे विभागाकडून लागू करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये सामान्य प्रवाशांना अधिक लाभ मिळणार असून, ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक राहणार असून, प्रत्येक प्रवाशाला तिकीट आरक्षणासाठी योग्य संधी मिळणार आहे. इथं महत्त्वाची बाब म्हणजे बनावट एजंटची तिकीट बुकिंगमध्ये असणारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.