SC Reprimands Woman: बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी भारतातील कायदे अत्यंत कडक आहेत. त्यात गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपींवर कठोर कारवाई होते. महिलांची सुरक्षितता आणि सन्मान लक्षात घेऊन हे कायदे बनवण्यात आले आहेत. असे असताना काही महिलांकडून या कायद्याचा दुरुपयोग होताना दिसतो. अशाच एका घटनेत सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेला खडे बोल सुनावले आहेत. काय आहे नेमका हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोप एका महिलेने केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले. सुनावणी दरम्यान कोर्टाने संबंधित पुरुषाचा अटकपूर्व जामीन कायम ठेवला. याच वेळी, न्यायालयाने संबंधित महिलेला कठोर शब्दांत फटकारले आणि तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत गंभीर इशारा दिला. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने यासंदर्भात भाष्य केले.
सविवाहित असताना महिलेने तिच्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरू शकतो.महिलेची याचिका आणि आरोप महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून असा दावा केला होता की,
संबंधित पुरुषाने मला लग्नाचे आश्वासन देऊन माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, अशी याचिका महिलेने सर्वोच्च न्यायालयात केली. या पुरुषाने मला फसवले आणि माझे लैंगिक शोषण केले. या आधारावर पुरुषाचा अटकपूर्व जामीन रद्द करण्याची मागणी तिने केली होती. मात्र, न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आणि पुरुषाचा जामीन कायम ठेवला.
ती आणि तो पुरुष अनेकदा हॉटेलमध्ये भेटले आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, असा युक्तिवाद महिलेच्या वकिलांनी न्यायालयात केला. यावर खंडपीठाने महिलेला उद्देशून म्हटले, “तू एक विवाहित महिला आहेस, तुला दोन मुले आहेत. तू एक प्रौढ व्यक्ती आहेस आणि तुला हे माहीत आहे की तू विवाहबाह्य संबंध ठेवून कायद्याचे उल्लंघन केले आहे.” न्यायालयाने पुढे प्रश्न उपस्थित केला की, “जर तुला त्याच्या हेतूबद्दल शंका होती, तर तू वारंवार त्याच्या विनंतीवरून हॉटेलमध्ये का गेली?” न्यायालयाने स्पष्ट केले की, तिचे वर्तन हे विवाहबाह्य संबंधांचे स्वरूपातील आहे. जे कायद्याच्या कसोटीवर गुन्हा ठरू शकते.
दोघांची ओळख 2016 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. तेव्हापासून ते दोघे एकमेकांशी नातेसंबंधात होते. महिलेचा दावा होता की, त्या पुरुषाच्या आग्रहामुळे आणि दबावामुळे तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हा घटस्फोट यंदाच्या 6 मार्च रोजी कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केला. घटस्फोटानंतर तिने त्या पुरुषाकडे लग्नाची मागणी केली, पण त्याने ती नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या महिलेने बिहार पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि पुरुषावर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला.कायदेशीर प्रक्रियाया तक्रारीनंतर, बिहारमधील पाटणा उच्च न्यायालयाने त्या पुरुषाला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याविरोधात महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयानेही तिची याचिका फेटाळून पुरुषाचा जामीन कायम ठेवला.
न्यायालयाने याप्रकरणी महिलेच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि तिच्या विवाहबाह्य संबंधांबाबत कठोर भाष्य केले.खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पुरुषाचा अटकपूर्व जामीन कायम ठेवताना महिलेला तिच्या कृतीबाबत गंभीर इशारा दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरू शकतो. या प्रकरणाने विवाहबाह्य संबंध आणि त्याचे कायदेशीर परिणाम यावर पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे.