Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेसने सॅनिटरी पॅडवर छापला राहुल गांधींचा फोटो? 'त्या' Video ने खळबळ; नेमकं सत्य काय?

Rahul Gandhi Photo On Sanitary Pad: काँग्रेसकडून वाटप करण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड्सवर राहुल गांधींचा फोटो असल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय; पण यामागील सत्य काय?

काँग्रेसने सॅनिटरी पॅडवर छापला राहुल गांधींचा फोटो? 'त्या' Video ने खळबळ; नेमकं सत्य काय?

Rahul Gandhi Photo On Sanitary Pad: भारतीय राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अनेकदा पातळी सोडून टीका केली जाते. अनेकदा नेते आणि पक्ष एकमेकांवर टीका करताना पातळी सोडून शाब्दिक टीका करतात. मागील काही काळापासून सोशल मीडियामुळे या आरोप-प्रत्यारोपांचा स्तर अधिकच खालावल्याचं दिसून येत आहे. खास करुन मागील सात ते आठ वर्षांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढल्याने हे संवादाचं आणि लोकांपर्यंत पोहचण्याचं नवं माध्यम झालं आहे. मात्र याचा गौरवापरही तितक्याच प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. सध्या अशाच एका सोशल मीडिया पोस्टमधून देशातील दोन सर्वात मोठे पक्ष आमने-सामने आले आहेत. हे प्रकरण लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधीसंदर्भातील आहे. नेमकं हे प्रकरण काय आणि त्यामागील सत्य काय हे पाहूयात...

नेमका दावा काय?

बिहारमध्ये पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झालेले आहेत. दोन्ही पक्षांकडून लोकांपर्यंत पोहचण्याची वेगवेगळी माध्यमं वापरली जात आहेत. बिहारमध्ये काँग्रेसकडून येथील पाच लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्यात आला. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटांवर राहुल गांधींचे फोटो दिसत असून थेट सॅनिटरी पॅड्सवरही राहुल गांधींचे फोटो छापण्यात आल्याचा दावा करण्यात आला. 

भाजपा गोवाच्या अधिकृत हॅण्डलवरुनही ही क्लिप शेअर करताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला. काँग्रेसने नको त्या ठिकाणी राहुल गांधींचा फोटो छापलाय, असा टोला गोवा काँग्रेसने लगावलेला. 


सत्य काय?

8 जुलै रोजी टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसने या प्रकरणामध्ये एफआयआर दाखल केली आहे. राहुल गांधींचा फोटो सॅनिटरी पॅडवर छापल्याचा खोटा दावा केला जात असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या सॅनिटरी पॅड्सच्या मुख्य खोक्यांवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे फोटो होते. मात्र पॅडवर कोणताही फोटो छापण्यात आला नव्हता, असंही या वृत्तात म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ खोटा असून या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्याची माहिती देताना एफआयआरची कॉपीही शेअर शेअर केली होती. 

काँग्रेसचे प्रसारमाध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनीही खोटा आणि खरा व्हिडीओ काय आहे हे दाखवणारं एक ट्विट केलं आहे.

एकंदरितच सॅनिटरी पॅडवर राहुल गांधींचा फोटो छापण्यात आल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं यावरुन सिद्ध होत आहे.

Read More