Marathi News> भारत
Advertisement

'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?

Ranveer Allahbadia Video : रणवीर खरंच इतका रडला? वक्तव्यानंतर त्यानं खरंच केली ही सर्व वक्तव्य? पाहा व्हिडीओ आणि त्यामागचं सत्य...  

'माझ्यामुळेच सगळं होतंय...', पश्चातापाची भाषा करत रणवीर अलाहबादिया ढसाढसा रडला; या Video मागचं नेमकं सत्य काय?

Ranveer Allahbadia Video : पॉडकास्ट शोमुळं (Podcast show) चर्चेत आणि प्रकाशझोतात आलेल्या रणवीर अलाहबादियाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. कॉन्टेंट क्रिएशन क्षेत्रात त्यानं आतापर्यंत दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान होता. पण, याच रणवीरनं 'इंडियाज गॉट लेटेंट' कार्यक्रमात एक असं वक्तव्य केलं, की त्याच्या या वक्तव्यामुळं त्याची संपूर्ण प्रतिमाच मलिन झाली. एकिकडे वैचारिक प्रश्न विचारत आपल्या पॉडकास्टमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना बोलतं करणारा रणवीर इतकं अश्लील वक्तव्य करतो हे पाहून नेटकऱ्यांसमवेत समाजातील अनेक स्तरांतून नाराजीचा तीव्र सूर आळवण्यात आला. 

अतिशय अभद्र शब्दांमध्ये त्यानं आई- वडिलांच्या नात्यासंदर्भातील एक प्रश्न विचारल्यामुळं हा या रोषानं डोकं वर काढलं. रणवीरविरोधात तक्रारही झाली. या सर्व विषयांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असतानाच आता या इन्फ्लुएन्सरचा एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पांढऱ्या टीशर्टमध्ये दिसणारा रणवीर या व्हिडीओमध्ये चक्क ढसाढसा रडताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर पश्चातापाची भाषाही करताना दिसत आहे. 

'मला वाईट वाटतंय... सर्व काम ठप्प झालंय. मला वाटतंय यासाठी मी स्वत: कारणीभूत आहे. संपूर्ण टीमचा चेहरा अशानं समोर आणला. माझ्यामुळं सारं काम बंद झालं', असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. रणवीरचा हा व्हिडीओ वक्तव्य त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर समोर आला असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर त्यानं सर्वत्र रोषाचं वातावरण पाहता दिलगिरी व्यक्त करत आपली चूक कबुल केल्याचं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. 

हेसुद्धा वाचा : 'मला घाणेरडी भाषा..' रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या वादादरम्यान आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल, हसवणं म्हणजे...

 

नेमकं सत्य काय? 

प्रत्यक्षात मात्र तसं काही नसून, हा व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहगे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेनंतर आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊन काळात त्यानं हा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याच व्हिडीओचा थंबनेल अर्थात पहिल्या नजरेत दिसणारा फोटोही सध्या व्हायरल केला जात आहे. त्यावेळी रणवीरला कोविडचं निदान झालं होतं आणि तेव्हात त्यानं व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्याचा सध्याच्या प्रकरणाशी काहीच थेट संबंध नाही. 

Read More