Marathi News> भारत
Advertisement

Fact Check : वादळात नाव बुडाली, समुद्राच्या तुफानाशी दोन हात करुन उपाशी राहिला; पावसाचं पाणी पिऊन जीवंत राहिला... काय आहे 'या' व्हिडीओची खरी कहाणी?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये रवींद्रनाथ दास नावाची व्यक्ती तब्बल ५ दिवस 600 किमी दूर पोहत आला. या व्हायरल पोस्टमागील सत्य काय? Fact Check मधून जाणून घ्या. 

Fact Check : वादळात नाव बुडाली, समुद्राच्या तुफानाशी दोन हात करुन उपाशी राहिला; पावसाचं पाणी पिऊन जीवंत राहिला... काय आहे 'या' व्हिडीओची खरी कहाणी?

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये रवींद्रनाथ दास नावाची व्यक्ती तब्बल ५ दिवस 600 किमी दूर पोहत आला. या व्हायरल पोस्टमागील सत्य काय? Fact Check मधून जाणून घ्या. 

नमखाना फिशरमन रवींद्रनाथ दास जो बांग्लादेशच्या जहाजावर कामाला होता. तो 15 साथीदारांसोबत मासेमारीसाठी गेला होता. यावेळी समुद्राने रौद्र रुप धारण केलं. यावेळी तो जहाजापासून वेगळा झाला आणि तब्बल 5 दिवस 600 किमी हून अधिक प्रवास करुन आला. 
बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, 'एमव्ही जवाद' नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं. नीट पाहिलं. कोणीतरी माणूस पोहत होता. त्यावेळी त्याचा जीव वाचला अशी पोस्ट व्हायरल होत आहे. 

व्हायरल होणारी पोस्ट 

पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात राहणारा हा माणूस काही दिवसांपूर्वी आपल्या 15 साथीदारांसह बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ मासे पकडण्यासाठी गेला होता. तेव्हा अचानक समुद्राचा मूड बदलला, जोरदार वादळ उठलं, लाटा बेफाम झाल्या आणि पाहता पाहता त्यांचं ट्रॉलर उलटलं.
सर्वजण समुद्राच्या प्रचंड लाटांमध्ये वाहून गेले... रवींद्रनाथही.
पण तो घाबरणारा नव्हता. मच्छीमार असल्याने पाणी त्याचा शत्रू नव्हता, तर साथी होता. त्याने हार मानली नाही.
तो पोहत राहिला... पोहत राहिला... वर फक्त आकाश, खाली अथांग पाणी. तास निघून गेले, दिवस सरले.
5 दिवस रवींद्रनाथ समुद्रात एकटा पोहत राहिला, ना खाणं, ना पिण्याचं पाणी, फक्त जगण्याचा हट्ट. जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो पावसाचं पाणी पिऊन स्वतःला जिवंत ठेवायचा. प्रत्येक क्षणी मृत्यू जवळ होता, पण त्याची हिम्मत त्यापेक्षा जास्त मजबूत होती.
5व्या दिवशी... सुमारे 600 किलोमीटर दूर, बांगलादेशच्या कुतुबदिया बेटाजवळ, 'एमव्ही जवाद' नावाचं जहाज जात होतं. जहाजाच्या कॅप्टनने दूरवर समुद्रात काही हलताना पाहिलं. नीट पाहिलं... कोणीतरी माणूस पोहत होता!
कॅप्टनने तात्काळ लाइफ जॅकेट फेकलं, पण ते रवींद्रनाथपर्यंत पोहोचलं नाही. तरीही कॅप्टन थांबले नाहीत... त्यांनी सीमा, धर्म, जातीच्या रेषा विसरून फक्त एकच गोष्ट पाहिली --- माणूस.
काही अंतरावर रवींद्रनाथ पुन्हा दिसला, आणि यावेळी कॅप्टनने जहाज वळवलं. लाइफ जॅकेट पुन्हा फेकलं, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.
क्रेनने त्याला वर खेचलं गेलं, थकलेला, अर्धमेला, पण जिवंत. जेव्हा तो जहाजावर चढला, तेव्हा संपूर्ण जहाजावरील खलाशी आनंदाने ओरडले. त्यांनी फक्त एक माणूस पाहिला नाही, तर माणुसकीला जिवंत पाहिलं.
त्या क्षणाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला, आणि तो देखावा आजही पाहणाऱ्याच्या मनाला हलवून ठेवतो.
 धन्यवाद, त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाला.
तुम्ही फक्त एक जीव वाचवला नाही, तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की माणुसकी अजूनही जिवंत आहे.
कधी कधी एका माणसाचा हट्ट आणि दुसऱ्या माणसाची करुणा, संपूर्ण जगाला अधिक चांगलं बनवू शकते.

सत्य काय?

ही पोस्ट 13 जुलै 2019 ची ही घटना आहे. या घटनेनंतर रवींद्रनाथ दास याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण आता पुन्हा एकदा जुलै महिन्याच्या 15 तारखेला ही घटना व्हायरल होत आहे. सत्य हे आहे की, ही घटना 2019 ची आहे. 

Read More