Marathi News> भारत
Advertisement

Fact Check | घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं

वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला. 

Fact Check | घोड्यासकटच नवरदेवाला उचलून गरागरा फिरवलं

मुंबई : बातमी आहे एका नवरदेवाच्या हटके वरातीची. वरातीत नाचता नाचता नवरदेवाच्या मित्रांनी घोड्यालाच उचलला आणि नवरदेव हैराण झाला. असं काय झालं वरातीत. चला पाहुयात. (fact check viral video friends picked up the horse while dancing at the wedding)

लग्नाच्या घोड्यावरून नवरदेवाची वरात काढल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण, या व्हीडिओत पाहा. चक्क नवरदेवासह घोड्याचीही वरात काढण्यात आलीय. नवरदेवाच्या उत्साही मित्रांनी घोड्यासकट त्याला उचलून घेतलं. आणि गरागरा फिरवलं.

तब्बल 15 जणांनी या नवरदेवाला उचललंय. बघा, कसे हे 15 जण नवरदेवाला उचलून नाचवतायत. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. लग्नाची ही अनोखी वरात चांगलीच चर्चेत आलीय. पण, यांनी या घोड्याला पकडलंय तरी कसं? 

इतक्या सहज हे घोड्यासह नवरदेवाला कसं काय नाचवतायत? आश्चर्य म्हणजे गरागरा फिरवत असताना घोडाही शांत उभा राहिलाय. तोसुद्धा जागचा हलत नाहीये. पण, हा व्हिडिओ पाहिला तर त्यामागचं सत्य समोर येतं. 

व्हीडीओ नीट पाहिला तर तुम्हाला घोड्याखाली एक खाट दिसेल. आधी या घोड्याला या खाटेवर उभं करण्यात आलं. त्यानंतर या घोड्यावर नवरदेव बसला. आणि मग सर्वांनी खाटेला सर्व बाजूंनी धरून उचललं आणि ही खाट गोल फिरवली. हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स हैराण झालेयत. हा व्हिडिओ व्हायरल होत असून, हटके वरातीची चर्चा सुरूये.

Read More