Bomb Threats Case : एकाच वेळी 11 राज्यांमध्ये 21 ठिकाणी शाळा, रुग्णालये आणि स्टेडियममध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीवाला ईमेल तिने पोलिसांना पाठवला. त्यानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हादरवून गेली होती. पण हा सगळा एक भयानक कट होता जो चेन्नईतील 30 वर्षीय रोबोटिक्स अभियंता रेनी जोशिल्डा हिने रचला होता. पोलिसांनी तिला अटक केली असून तिने यामागील कारण सांगितल्यावर पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने हा सर्व कट एकतर्फी प्रेमातून रचला होता. तिच्या एक्स सहकाऱ्याला अदल घडविण्यासाठी तिने खोटे बॉम्ब धमकीचे मेल पाठवल्याचा आणि एअर इंडिया विमान जबाबदारी घेतल्याचा आरोपही तिच्यावर आहे.
टीओआयच्या वृत्तानुसार, या तंत्रज्ञाने बनावट ईमेल अकाउंट्स, व्हीपीएन आणि डार्क वेब सारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर करून शाळा, रुग्णालये आणि स्टेडियमना लक्ष्य करून किमान 21 ठिकाणी अनेक बनावट धमक्या पाठवल्या. इतकंच नाही तर तिने 12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची खोटी जबाबदारी घेऊन खळबळ उडवून दिली होती.
रेनी जोशिल्डा ही रोबोटिक्समध्ये प्रशिक्षित इंजिनिअर आहे. ती 2022 पासून चेन्नईतील डेलॉइट येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करत आहे. बेंगळुरूमधील एका प्रकल्पादरम्यान जोशिल्डा दिविज प्रभाकरला भेटली आणि त्याच्या प्रेमात पडली. पण दिविजने रेनीच्या भावनांना प्रतिसाद दिला नाही आणि दिविजने या वर्षी फेब्रुवारीमध्ये दुसऱ्याशी लग्न केलं. एकतर्फी प्रेमाचे रूपांतर सूडात झाल्याचे पोलीस तपासात समोर आलंय.
यानंतर जोशिल्डाने दिविजवर बदला तिने निश्चर्य केला. त्याच्या नावाने अनेक बनावट ईमेल अकाउंट तयार केले आणि त्याला अडकवण्यासाठी त्याच बनावट आयडीवरून अनेक बॉम्बस्फोटाच्या धमक्या पाठवल्या. पोलिसांनी सांगितले की, 'ते एकत्र काम करत असताना, ती बनावट ईमेल अकाउंट तयार करायची आणि तिच्या गुप्त प्रियकरात रस दाखवणाऱ्या कोणालाही त्रास द्यायची. एका प्रकरणात, तिने एका महिला सहकाऱ्याला पुरुष सहकाऱ्यात रस असल्याच्या संशयावरून त्रास दिला, इतका की तिने तिची नोकरी सोडली.'
झोशिल्डाने अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाला ईमेल केला. एवढंच नाही तर 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमान अपघाताची जबाबदारी घेतली. तिने ईमेलमध्ये लिहिलं की, 'मला वाटतं की तुम्हाला आता शक्तीची जाणीव झाली आहे. जसे आम्ही काल तुम्हाला मेल पाठवला होता, आम्ही आमचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह एअर इंडियाचे विमान क्रॅश केलं. आम्हाला माहित आहे की, पोलिसांनी विमान अपघाताला खोटेपणा मानले असेल आणि त्याकडे दुर्लक्ष केलं असेल. आमच्या पायलटचे अभिनंदन. आता तुम्हाला कळलं की आम्ही खेळत नाही आहोत. आता तुम्हाला कळलं.'
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, झोहिल्डाने एकट्या अहमदाबादमधील 21 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती ज्यामध्ये मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियम, सरखेजमधील जिनेव्हा लिबरल स्कूल आणि एक सिव्हिल हॉस्पिटल यांचा समावेश आहे. बॉम्बस्फोटाची अफवा गुजरातच्या पलीकडे पसरली होती, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, केरळ, बिहार, तेलंगणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि हरियाणा येथील पोलिस आणि संस्थांना धमकीचे ईमेल प्राप्त झाले होते.
पोलिसांचे म्हणणे आहे की, जोशिल्डाने गेल्या दोन वर्षांत VPN द्वारे किमान 80 नंबर खरेदी केलं आणि या नंबरद्वारे शेकडो बनावट ईमेल पाठवले. पोलीस आयुक्त शरद सिंघल म्हणाले, 'ईमेल आयडी तयार करण्यासाठी ती वापरत असलेला नंबर व्हर्च्युअल होता. ती टॉर ब्राउझर आणि डार्क वेबद्वारे धमकी देणारे ईमेल पाठवत असे. ती खूप सावध होती. ती खूप हुशार होती आणि तिने कधीही तिचा डिजिटल ट्रेल उघड केला नाही. पण तिने एक छोटीशी चूक केली आणि आमच्या सायबर क्राइम विंग आणि क्राइम ब्रांचने तिचा माग काढला.'
डार्क वेब आणि व्हीपीएन वापरून ती तिची ओळख आणि स्थान लपवण्यात यशस्वी झाली, पण एके दिवशी तिने चुकून तिचं ठिकाण उघड केलं. अहमदाबाद मिररमधील एका वृत्तानुसार, झोहिल्डाने एकदा एकाच डिव्हाइसवरून तिच्या खऱ्या आणि बनावट ईमेल खात्यांमध्ये लॉग इन केले होते. यामुळे पोलिसांना तिचा आयपी पत्ता शोधण्यात मदत झाली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "त्या एका निष्काळजी लॉगिनमुळे ती उघड पोलिसांच्या जाळ्यात अडकली."