Ayodhya Viral Video: मुलाचा जन्म हा प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं. लहानपणी आई वडील त्या तान्हुल्याचे पाय असतात आणि मग बाळ मोठं झाल्यानंतर वृद्धापकाळात ते आई वडिलांची सेवा करेल. पण सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्याने रात्रीच्या अंधारात रस्त्यावर असहाय्य सोडून दिलं. ही घटना तिथे असलेल्या जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रामभूमी अयोध्यामधील आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या शांततेत रस्त्याच्या कडेला सोडून दिले आणि ते पळून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण आहे.
किशन दासपूर परिसरात, कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी रात्रीच्या अंधारात रस्त्यावर सोडून दिले. ही संपूर्ण घटना बुधवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडल्याच तपासात समोर आलं आहे.
यूपी के अयोध्या से एक मानवता को शर्मसार कर देने वाली खबर सामने आई है। एक कैंसर पीड़िता बुजुर्ग को परिजनों रात के अंधेरे में बीच रास्ते में छोड़कर चले गए। बुजुर्ग की इलाज के दौरान मौत हो गई।
— Zee News (@ZeeNews) July 25, 2025
बताया जा रहा है कि बीती बुधवार रात करीब दो बजे दो महिलाएं और एक पुरुष ई-रिक्शा से… pic.twitter.com/YIMXkltSXr
व्हिडीओमध्ये, हे तिघे जण वृद्ध महिलेला रिक्षातून चादरीतून घेऊन येतात आणि एका कोपऱ्यात बेडसह सोडून जातात. जाताना, एक महिला मागे वळून वृद्ध महिलेच्या चेहऱ्याकडे पाहते, पण काहीही न बोलता, तिघेही शांतपणे घटनास्थळावरून निघून जातात. सकाळी स्थानिक लोकांनी वृद्ध महिलेला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वृद्ध महिलेला रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. असं सांगितलं जात आहे की ही महिला कर्करोगाने ग्रस्त होती आणि उपचार घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यामुळे कुटुंबाने हे धक्कादायक पाऊल उचलं. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण म्हणत आहेत, अशी मुलं नकोत.