Anand Mahindra Reply Goes Viral: सोशल मीडियावरील सर्वात सक्रीय उद्योदकांपैकी एक म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे (Mahindra and Mahindra) सर्वेसर्वा आनंद महिंद्रा! (Anand Mahindra) आनंद महिंद्रा हे 'एक्स'वरुन (ट्विटरवरुन) अनेक प्रेरणादायी आणि मजेदार पोस्ट करत असतात. आनंद महिंद्रा या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे कायमच चर्चेत असतात. अनेकदा आनंद महिंद्रा संवेदनशील विषयांवर भाष्य करताना दिसतात. लोकांना सामाजिक गोष्टींची जाणीव करुन देणारे विषय ते सहज हाताळतात. त्यांच्या या मतांवरुन सोशल मीडियावर अनेक चर्चा होतात आणि त्या चर्चा अगदी बातम्यांमध्येही झळकतात.
मात्र आनंद महिंद्रांच्या या सक्रीयतेमुळेच बरेच जण त्यांच्याकडे या माध्यमातून वाटेल त्या मागण्या करत असतात. मात्र या अशा अनोख्या मागण्या करणाऱ्या चाहत्यांनाही आनंद महिंद्रा अगदी मजेदार उत्तरं देतात. असाच एक प्रकार नुकताच घडला. झालं असं की, एका फॉलोअरने आनंद महिंद्रांकडे थेट पैशांची मागणी केली. आनंद महिंद्रांकडे या तरुणाने तब्बल 1 लाख रुपयांची मागणी केली. मात्र ज्या कारणासाठी आनंद महिंद्रांकडे या तरुणाने पैसे मागितले ते कारण पाहून अनेकांनी एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे या अशा कारणासाठी एवढे पैसे मागायला हिंमत लागते, असं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर या व्यक्तीने आनंद महिंद्रांच्या पोस्टवर रिप्लाय करताना, "सर मला महिंद्राचे शेअर्स घेण्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत," असं म्हटलं. यावर आनंद महिंद्रांनी मागणी इतकेच भन्नाट उत्तर दिलं.
Sir mujhe 1 lakh rs chaiye mahindra ka share kharidna ka liya
— R (@R41534672) December 26, 2023
"काय कल्पना आहे सर! तुझ्या हिंमतीवर नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजेत. विचारायला काय जातंय नाही का?" असा रिप्लाय आनंद महिंद्रांनी केला आहे.
What an idea Sirji.
— anand mahindra (@anandmahindra) December 27, 2023
Aapki himmat ke liye Taaliyaan! Poochne mein kya jaata hai? https://t.co/respZDQXKl
सोशल मीडियावर आनंद महिंद्राचा रिप्लाय व्हायरल झाला आहे. या पोस्टला 3.3 लाखांहून अधिक लोकांना पहिलं आहे. 4 हजारांहून अधिक जणांनी हा रिप्लाय लाइक केला आहे. एकाने या व्यक्तीच्या विश्वासाला दाद दिली पाहिजे असं म्हटलं आहे. समोरची व्यक्ती चांगल्या मूडमध्ये असेल तर पैसे देईलही, अशी शक्यता अन्य एकाने व्यक्त केली आहे.
Kya pata saamne wala kisi din mood me ho aur maan hi jaye….
— A Singh (@irrationalkiddd) December 27, 2023
लोकांनी आनंद महिंद्रांकडे करण्यात आलेली मागणी आणि त्यांनी दिलेल्या रिप्लायवरुन पैसे मागणाऱ्या या व्यक्तीची चांगलीच फिरकी घेतली आहे.