Marathi News> भारत
Advertisement

असं धाडस करु नका! 12 व्या मजल्यावर बाल्कनीला लटकून ही व्यक्ती काय करतेय पाहा, VIDEO व्हायरल

समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा धोकादायक स्टंट कॅमेरात कैद केला

असं धाडस करु नका! 12 व्या मजल्यावर बाल्कनीला लटकून ही व्यक्ती काय करतेय पाहा, VIDEO व्हायरल

फरीदाबाद : टोलेजंग इमारतीच्या 12व्या मजल्यावरील बाल्कनीच्या रेलिंगला धरून व्यायाम करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.  इमारतीतील इतर फ्लॅटमधील लोक त्याला समजावून सांगत असून असं करण्यापासून रोखत आहेत. यादरम्यान, फ्लॅटच्या आतून एक मुलगा येतो आणि लटकलेल्या व्यक्तीला आत घेऊन जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय.
 
हा व्हिडिओ ग्रेटर फरीदाबाद इथल्या सेक्टर-८२ येथील ग्रँडुइरा सोसायटीच्या ई-ब्लॉकचा आहे.

ग्रेंडुइरा सोसायटी आरडब्ल्यूएचे अध्यक्ष दीपक मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे. या व्यक्तीचं वय सुमारे 56 वर्षे आहे. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती आहे. त्यांना 28 वर्षांचा मुलगाही आहे. हा व्यक्ती या ठिकाणी भाड्याने राहतो. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरडब्ल्यूएच्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना याची माहिती दिली. तसंच भविष्यात असे प्रकार करु नयेत असंही बजावलं.

दरम्यान, या घटनेनंतर घरमालकाने त्या व्यक्तीला घर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच यापुढे असे प्रकार केल्यास कारवाई केली जाईल असंहा बजावण्यात आलं आहे. पोलीस प्रवक्ते सूबेसिंह यांनी याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं सांगितलं. तसंत असं धाडस करु नये याचं लोकांनी भान ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Read More