Marathi News> भारत
Advertisement

शेतकऱ्याकडून PM मोदींना एवढ्या पैशांची मनी ऑर्डर!

देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन करुन आपल्या मागण्या पूर्ण होण्याची आशा करत आहेत. तसेच महाराष्टातही काही शेतकरी आहेत त्यांना पीक विकूनही किंमत देखील मिळत नाही

शेतकऱ्याकडून PM मोदींना एवढ्या पैशांची मनी ऑर्डर!

मुंबई: देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीत विरोध प्रदर्शन करुन आपल्या मागण्या पूर्ण होण्याची आशा करत आहेत. तसेच महाराष्टातही काही शेतकरी आहेत त्यांना पीक विकूनही  किंमत देखील मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाशी लढत आहेत. कांदाच्या किंमत घसरण झाल्याने शेतक-यांना चिंता वाटत आहे. शेतकऱ्यांना १ रुपायात १ किलो कांदा विकण्याची परस्थिती निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्याने पिकाची योग्य रक्कम मिळाली नाही, म्हणून कांदा विकून मिळालेला पैसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर केली आहे. 

fallbacksशेतकऱ्यांने अशी इच्छा व्यक्त केली आहे की, ही रक्कम पंतप्रधानांच्या मदत निधीमध्ये जमा केली जाईल. येथील व्यापारी कांदा खरेदी करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. कांदे उत्पादनात नाशिक सर्वात मोठा जिल्हा आहे. येथील शेतकरी सरकारवर नाराज आहेत. 

निफाड गावातील संजय साठे या शेतकऱ्याने लासलगावातील उपबाजारात कांदे विकण्यास घेऊन गेले होते. संजय साठे यांना १ क्विंटलमागे १५० रुपये मिळले होते. शेतीतील साडेसात क्विंटल कांदे विकूनही त्यांचा हातात फक्त १ हजार ११८ रुपये आले होते.

अशा प्रकारे नाराजी व्यक्त 

या पैशाची किंमत कांद्याच्या पेरणीपेक्षा कमी होती. यावर नाराज होऊन हा शेतकरी पोस्ट ऑफिसमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने कांदे विकून मिळालेले १ हजार ११८ रुपये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डर केली आहे. 

पीएम मोदी यांना मनी ऑर्डर केलेला डिजिटल बॅनर त्याने त्याच्या ट्रॅक्टर लावला होता. कांदे उत्पादक शेतकरी संजय साठेने सांगितले की, 'कांद्याचे भाव पडत आहेत. केंद्र सरकारने यावर विचार केला पाहिजे. केंद्र सरकारला जाग यावी म्हणून मी कांदे विकून मिळालेला 

पैसा पीएम मोदी यांना मनी ऑर्डर केला आहे. ही रक्कम पंतप्रधानांच्या मदत निधीमध्ये जमा करावे.'

 

Read More