Marathi News> भारत
Advertisement

कमी खर्चात लाखोंची कमाई! हे काटेरी रोप तुम्हाला बनवेल श्रीमंत शेतकरी; एकदाच लावा आणि 5 वर्षे कमवा!

Aloe Vera Cultivation: कोरफड लागवड ही कमी खर्चात आणि कमी मेहनतीत शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक लाभ देणारी संधी आहे. 

कमी खर्चात लाखोंची कमाई! हे काटेरी रोप तुम्हाला बनवेल श्रीमंत शेतकरी; एकदाच लावा आणि 5 वर्षे कमवा!

Aloe Vera Cultivation: कोरफड हे आता केवळ औषधी किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठीच मर्यादित राहिलेले नाही. या वनस्पतीच्या लागवडीने देशभरातील अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन बदलले आहे. कमी पाणी, कमी मेहनत आणि बाजारात सतत वाढणारी मागणी यामुळे कोरफड आता सामान्य शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत फायदेशीर पीक बनलंय. विशेष बाब म्हणजे ही लागवड कमी सुपीक किंवा ओसाड जमिनीवरही यशस्वीपणे करता येते.

लागवडीसाठी जमिनीची तयारी कशी?

कोरफडीच्या लागवडीसाठी जमिनीला विशेष सुपीकता लागत नाही. वाळूच्या किंवा हलक्या जमिनीत, जिथे पाणी साचत नाही, तिथे ही वनस्पती उत्तम वाढते. लागवडीपूर्वी शेताची 1-2 वेळा नांगरणी करावी लागते. त्यानंतर, प्रति हेक्टर 10 ते 15 टन शेणखत मिसळले जाते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. लागवडीसाठी कोरफडीच्या मुळांपासून तयार होणारी लहान रोपे (सकर्स किंवा राईझोम कटिंग्ज) वापरली जातात. एका एकरात साधारण 14,500 रोपे लावली जाऊ शकतात, आणि रोपांमधील अंतर 40×45 सेंटीमीटर ठेवले जाते.

देखभाल आणि पाणी कसं द्यायचं? 

कोरफडीला जास्त पाण्याची गरज भासत नाही. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीत दर 15 दिवसांनी एकदा पाणी देणे पुरेसे आहे. जास्त पाणी दिल्यास मुळे खराब होण्याची शक्यता असते. तण नियंत्रणासाठी वर्षातून 2-3 वेळा तण काढावे लागते. शेणखताव्यतिरिक्त, प्रति एकर 20:20:20 किलो NPK खताचा वापर केला जातो, ज्यामुळे वनस्पतींची वाढ चांगली होते.

3 ते 5 वर्षांसाठी सातत्याने उत्पन्न

लागवडीनंतर 6 ते 8 महिन्यांत कोरफडीची पाने कापणीसाठी तयार होतात. दुसऱ्या वर्षापासून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होते, आणि एक झाड सलग 3 ते 5 वर्षे पाने देत राहते. पाने कापताना ती तळापासून कापली जातात, जेणेकरून झाड पुन्हा वाढू शकेल.

कमी खर्चात लाखोंची कमाई कशी शक्य?

कोरफडीच्या लागवडीसाठी एका एकरात साधारण 40,000 ते 55,000 रुपये खर्च येतो. मात्र, योग्य देखभाल आणि सिंचन केल्यास, दरवर्षी एका एकरातून 15 ते 18 टन पाने मिळतात. बाजारात या पानांना प्रति टन 15,000 ते 20,000 रुपये भाव मिळतो. यामुळे एका एकरातून 2 ते 6 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. जर शेतकऱ्याने कोरफडीचा रस, जेल किंवा सौंदर्यप्रसाधने यासारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार केली, तर ही कमाई आणखी वाढू शकते.

कसे बनाल यशस्वी शेतकरी?

कोरफड लागवड ही कमी खर्चात आणि कमी मेहनतीत शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक लाभ देणारी संधी आहे. कमी सुपीक जमिनीवरही यशस्वी होणारे हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊ शकते आणि त्यांना परिसरातील यशस्वी शेतकरी बनवू शकते.

Read More